मुंबई : अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) कायम त्याच्या फिटनेसमुळे आणि सोशल मीडियावरील फोटोंमुळे सतत चर्चेत असतो. शिवाय त्याची आई आणि पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) देखील अत्यंत फिटनेस फ्रिक आहेत. आता पुन्हा मिलिंद चर्चेत यायचं कारण म्हणजे त्याचा फार जुना फोटो. सोशल मीडियावर मिलिंदने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो अत्यंत तरूण दिसत आहे. सध्या त्याचा फोटो सोशल मीडियानवर तुफान व्हायरल होत आहे.
मिलिंदचा हा फोटो 1991 सालचा आहे. ज्यामध्ये त्याने काश्मीरी आऊटफिट घातलं आहे. मिलिंदने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये '1991 सालचा फार जुना फोटो पण अत्यंत छान असे काश्मीरी कपडे, एक जोड स्पान्डेक्स शॉर्ट्स आणि दिल्लीचं कडकडीत ऊन....' असं लिहिलं आहे.
मीलिंदच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरने 'फोटोशूट झाल्यानंतर आपण अभिनेता किंवा मॉडेल ते कपडे आपल्याकडे ठेवू शकतो.? तर दुसऱ्या युजरने फक्त केस बदलली आहेत, बाकी काही नाही...' असं म्हणत मिलिंदचं कौतुक केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मिलिंदच्या फोटोवर त्याची पत्नी अंकिताने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मिलिंदचा जुना फोटो पाहून अंकिताने 'Yummnn'अशी कमेंट केली आहे. अंकिता आणि मिलिंदच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये वयाचं अंतर फार आहे. पण प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसते हे दोघांनी दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांचा वर्ग तर आहेचं, पण त्यांना ट्रोल करणाऱ्यांचा वर्ग दोखील फार मोठा आहे.