औरंगाबाद रेल्वे अपघात : मोदींच्या ट्विटवर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया

अनुराग कश्यपने या ट्विटमध्ये म्हटलंय की

Updated: May 8, 2020, 06:22 PM IST
औरंगाबाद रेल्वे अपघात : मोदींच्या ट्विटवर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया  title=

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यात शु्क्रवारी सकाळी रेल्वे अपघात झाला. या अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईवरून ३६० किमीचा प्रवास करून हे मजुर औरंगाबादला चालत जात होते. परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून दुःख व्यक्त केलं. यावर बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. 

अनुराग कश्यपने या ट्विटमध्ये म्हटलंय की,' हे काय पंतप्रधान आहेत? भाई. Assistance to Who? प्रेत उचलण्यासाठी? आणि काय रेल्वे रूळाच्या डाव्या बाजूला किती आणि उजव्या बाजूली किती ही परिस्थिती मॉनिटर करण्यासाठी?' अनुराग कश्यपच्या या ट्विटवर अनेक रिऍक्शन येत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की,'या घटनेने प्रचंड दुःख झालं आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोअल यांच्याची चर्चा झाली आहे. ते परिस्थितीची पाहणी करत आहे.' अशा आशयाचं ट्विट करण्यात आलं आहे.