Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अर्जुन कपूरनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील अर्जुनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं त्याच्या चित्रपटांमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला याविषयी सांगितलं. त्यानं यावेळी सांगितलं की हाशिमोटो नावाच्या आजारानं त्रस्त झालेत.
अर्जुननं 'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'जेव्हा तुमचे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा तुम्ही स्वत: वर प्रश्न चिन्ह उपस्थित करु लागतात. माझ्यासोबत देखील असं झालं. ज्याचं आयुष्यच चित्रपट आहेत. मी चित्रपट एन्जॉय करणं बंद केलं होतं. मी अचानक दुसऱ्यांचं काम पाहू लागलो होतो आणि स्वत: ला विचारू लागलो होतो की मी हे करु शकेल का आणि मला ही संधी मिळेल का? काही काळानंतर मला समजलं की काही ना काही प्रॉब्लम आहे. मग मी थेरेपी सुरु केली.'
अर्जुननं पुढे सांगितलं की "मी थेरेपी सुरु केली, काही थेरेपिस्टकडे गेलो पण काही फायदा झाला नाही. मग मला एक अशी व्यक्ती भेटली ज्यानं मला बोलण्याची संधी दिली. त्यानं सांगितलं की मी डिप्रेशनमध्ये आहे. मी कधीच याविषयावर मोकळेपणानं बोलू शकलो नाही, पण मला हाशिमोटो (एक ऑटोइम्यून आजार जो थायलॉइडला नुकसान पोहोचवतो). यात असं काही होतं उदाहरण जर मी प्रवास करत आहे आणि माझ्या मेंदूला वाटत असेल की मी कोणत्या संकटात आहे तर माझं वजन वाढू लागतं. जेव्हा मी 30 वर्षांचा होतो तेव्हा मला हा आजार झाला होता. माझ्या आईला देखील हा आजार होता आणि माझी बहीण अंशुलाला देखील हा आजार आहे."
हेही वाचा : 'लग्नाआधीच रुपाली गांगुली होती प्रेग्नंट, माझ्याकडे पुरावे...'; सावत्र मुलीनं केले गंभीर खुलासे
याविषयी पुढे बोलताना अर्जुन म्हणाला, "यामुळे माझ्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे अनेक शारिरीक समस्या उद्भवतात. यामुळे माझ्या लाइफस्टाईलवर देखील परिणाम होतो. शरिरारतील एनर्जी लेव्हल हळू-हळू कमी होऊ लागते. त्यात एक अभिनेता असल्यानं मला माझ्या फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं आणि त्यात अशा समस्या अडथळा निर्माण करतात."