Ashish Vidyarthi's son's reaction on his marriage : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी हे त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत होते. आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. त्यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं तर अनेकांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत. आनंदी रहा असा आशीर्वादही दिला. पण तुम्हाला माहितीये का त्यांची पहिली पत्नी असून त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. अनेकांनी त्यांना विचारलं होतं की तुमच्या मुलाची दुसऱ्या लग्नावर काय प्रतिक्रिया आहे. त्यावर आता आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या मुलाची काय प्रतिक्रिया होती त्याचा खुलासा केला आहे.
आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठीत जाण्याआधी दुसरं लग्न केलं. ते पाहता काही लोकांनी इतक्या वयात दुसरं लग्न केल्यामुळे त्यांना ट्रोल केलं आहे. त्यांच्या या खासगी निर्णयावर प्रत्येकानं त्यांच मत मांडलं आहे. त्यांच्या या लग्नावर पहिली पत्नी राजोशी यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. राजोशी यांनी तर थेट एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. आता त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशिष विद्यार्थी त्यांच्या मुलावर याचा काय परिणाम झाला याविषयी सांगितलं आहे. आशिष म्हणाले, "त्यावेळी माझ्या आत अपराथीपणाची भावना होती. माझ्या मुलाला मला असं जीवन द्यायचं नव्हतं."
पुढे पहिल्या घटस्फोटाविषयी बोलताना आशिष विद्यार्थी, म्हणाले "आम्हाला कळून चुकले होते की एकत्र राहणे आम्हा दोघांसाठी आता काही फायद्याचं नाही. आमचे आधी जे विचार होते ते आता राहिलेले नाहीत." त्यांच्या मुलाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याला आनंद झाला होता. त्याला याचा आनंद होता की एकमेकांना त्रास देण्यापेक्षा ते एकमेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विभक्त होत आहेत. पण काहीही झालं तरी ही गोष्ट समजून घेण्याचा तो आजही प्रयत्न करत आहे.
आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी कोलकाता येथे फॅशन डिझायनर रुपाली बरुआशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी 30 वर्षाच्या मुलीश लग्न केलं असं म्हटलं जात होतं. तर म्हातारपणात दुसरं लग्न केलं म्हणतं अनेकांनी ट्रोल केलं. त्यानंतर आशिष यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यावर "रुपाली 50 वर्षांची आहे आणि मी 57 वर्षांचा आहे. 60 वर्षांचा नाही. पण वय किती आहे यानं काहीही फरक पडत नाही," अस ते म्हणाले.