Ashok Saraf Birthday: अभिनयातले देव, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. इंडस्ट्रीमध्ये अशोक मामा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ यांच्या चित्रपटांची जादू आजही कायम आहे. आपल्या भन्नाट अभिनयानं ते प्रेक्षकांचे कायमच मनोरंजन करत आले आहे. मागील वर्षी त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यावेळी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावर्षी त्यांचा झी चित्र जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. वयाची 75 ओलांडली तरीसुद्धा अशोक सराफ यांचे स्पिरीट पाहून त्यांचे चाहते आजही त्यांचे कौतुक करताना दिसतात. त्यामुळे अशोक सराफांची चर्चाही कायम होते.
नाटक, सिनेमा, सिरियल्स, जाहिराती अशा नानाविध माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. त्यांच्या आगाळ्यवेगळ्या स्टाईल्स सर्वत्र कौतुक होताना दिसतेच परंतु त्याची अजून एक फॅशन स्टाईल प्रेक्षकांंच्या लक्षात आहे ती म्हणजे ते आपल्या शर्टाची दोन बटणं कायमच उघडी ठेवायचे. त्यांची ही स्टाईल पाहून तेव्हा अनेक जण त्यांना फॉलोही करायचे. त्यामुळे तेव्हा ही स्टाईल ते रूपेरी पडद्यावरही फॉलो करताना दिसायचे. त्यांच्या या हटके स्टाईलची तेव्हा चर्चाही व्हायची. अनेकदा त्यांना हा प्रश्नही विचारला जातो की ते कायमच आपल्या शर्टाची बटणं उघडी का ठेवत असतं?
मध्यंतरी अनेक मुलाखतींतून त्यांनी याविषयी खुलासा केला होता. अशोक सराफांचे सगळे चित्रपट गाजले. त्यातील जवळपास सगळ्यांच चित्रपटांमध्ये अशोक सराफ हे आपल्या शर्टाची पहिली दोन बटणं ही उघडी ठेवायचे. तेव्हा ही फॅशनही जोरात होती. त्या काळात हिंदीच काय मराठी चित्रपटांच्या हिरो हिरोईन्सला फॉलो करणारा चाहतावर्गही मोठा होता. एवढंच काय त्यांच्या फॅशनलाही लोकं फॉलो करत होते. त्यावेळी नायकाची हेअरस्टाईल, कपड्याची फॅशन, मिश्यांची फॅशनही फॉलो केली जायची आणि त्यावेळी अशोक सराफांनी शर्टाची दोन बटणं उघडी ठेवायचा ट्रेण्ड सेट केला.
हेही वाचा >>>> जेनेलिया देशमुखनं साजरी केली वटपौर्णिमा; रितेशला टॅग करत म्हणाली, ''मला आयुष्यभर...''
अशोक मामा म्हणतात की त्यावेळी कॉलरपर्यंत बटणं पुर्ण लावल्यावर अशोक मामांना फार उकडायचे आणि त्यामुळे मोकळं वाटण्यासाठी ते आपल्या शर्टाची दोन बटणं ही ओपन ठेवायचे. त्यामुळे काम करणंही सोप्पं व्हायचं. त्यांची ही फॅशन इतकी लोकप्रिय होईल, याची अशोक मामांनाही कल्पना नव्हती. अशोक सराफ यांचा मागच्या वर्षी 'वेड' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांनी रितेश देशमुखच्या वडिलांची भुमिका केली होती.