'देशात दुसरा मुद्दाच नाहीय का?' लूक्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना आयशाने दिलं उत्तर

Ayesha Takia looks:  मला कसं दिसायला हवं आणि कसं नाही, लोक त्यांचे विचार माझ्यावर थोपतायत, असे आयशा म्हणाली.

Pravin Dabholkar | Updated: Feb 19, 2024, 07:56 AM IST
'देशात दुसरा मुद्दाच नाहीय का?' लूक्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना आयशाने दिलं उत्तर  title=
Ayesha Takia looks

Ayesha Takia looks: बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकीयाचे मुंबई एअरपोर्टवरील फोटो समोर आले. यानंतर लोकांनी तिला तिच्या वजनावरुन टोमणे मारायला सुरुवात केली. कोणी म्हटलं प्लास्टिक सर्जरीमुळे आयशाची अशी अवस्था झालीय. तर कोणी म्हटलं वाढत्या वयामुळे ती अशी दिसतेय. एकंदरीत सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं. पण आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलंय. कृपया मला सोडा. मला ना सिनेमात यायचंय..ना मला प्रसिद्धी हवीय...मला फिल्म इंडस्ट्रीत इंट्रेस्टही नाहीय... असे म्हणत तिने सोशल मीडिया अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. 

माझ्या दिसण्यावर प्रश्न..देशात दुसरा मुद्दाच नाहीय' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayesha Takia Azmi (ayeshatakia)

आयशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. मला हे सांगाव लागेल की मी 2 दिवसांपुर्वी गोव्याला गेली होती. माझ्या परिवारात अचानक एक मेडिकल एमर्जन्सी आली होती. माझी बहिण रुग्णालयात होती. या दरम्यान मला एअरपोर्टवर थांबवण्यात आले. मी काही सेकंद पोझ देखील दिली. त्यानंतर माझ्या दिसण्यावर प्रश्न उपस्थित केले जात असल्यासे मला सोशल मिडियावर दिसले. जसे की या देशात दुसरा कोणता मुद्दाच उरला नाहीय...' असे ती संतप्तपणे म्हणाली.

ना सिनेमात स्वारस्य...ना प्रसिद्धीत 

आयशा पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणते, मला कसं दिसायला हवं आणि कसं नाही, लोक त्यांचे विचार माझ्यावर थोपतायत. प्लीज माझी पाठ सोडा. मला सिनेमामध्ये झिरो इंट्रेस्ट आहे. ना मला सिनेमात परत यायचंय, ना मला यात आवड आहे. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि मी माझे आयुष्य खूप छान जगतेय. मला लाइमलाइटमध्ये नाही राहायचंय. ना प्रसिद्धीमध्ये कोणता इंट्रेस्ट आहे. मला सिनेमा नाही करायचेयत..त्यामुळे चिल्ल...माझी काळजी करणं बंद करा..'

15 वर्षापुर्वीसारखी कशी दिसेन?

मी जशी 15 वर्षांपुर्वी दिसायची तशी मी आता कशी काय दिसू शकेन? असा प्रश्न विचारत तिने आश्चर्य व्यक्त केलंय. लोकांना वाटतं मी आतापण तशीच दिसावी. पण हे कसं शक्य आहे. हा वेडेपणा आहे. आयशाने असं बरच काही आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. 

2011 नंतर सोडली सिनेइंडस्ट्री 

आयशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. यानंतर ती काही म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली. फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उड उड जाए...' मुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. यानंतर आयशाने टारझन: द वंडर कार आणि सलमान खानसोबत वॉंन्टेड सारखा सिनेमा केला. आयशाने 2011 पर्यंत सिनेमात काम केले पण त्यानंतर ती फिल्डपासून दूर झाली.