मुंबई : बाजी या झी मराठीच्या नव्या मालिकेच्या तिसऱ्या एपिसोडची सुरुवात फार रोमांचकतेने झाली. चंद्रावर रागाने ओरडणाऱ्या बडी बी ला म्हणजे चंद्राबाईला पाहून बाजीच्या मनात असंख्य प्रश्नाचे वादळ उठले होते. पण काही क्षणात बाजीला ईनाम देण्यात यावा असे चंद्राबाई शेवंताला सांगतात. पण ते स्विकारण्यास बाजी साफ नकार देतो. दरम्यान शिलेदार आल्याची खबर चिंचोक्या हिराबाईंना देतो आणि त्यांना बघायला हिराबाई कसलाही विचार न करता महालातून धाव घेते.
महालातून बाहेर पडणाऱ्या बाजींची हिरबाईंशी नजरानजर होते. बाजी घरी परतल्यावर पुन्हा बाजीच्या आईची त्याच्या लग्नासाठीची बडबड सुरु होते. तेवढ्यात चंद्रबाईंनी दिलेले ईनाम बाजी आईच्या हातावर ठेवतो आणि आई खुश होते व म्हणते फार मोठं काम केलंस बघ. आता आपली जमीन तू सोडवणार याची मला खात्री आहे. परंतु मिळालेले ईनाम हे दुसऱ्याने आपल्याकडे ठेवायला दिले आहे असे सांगून बाजी घराबाहेर पडतो.
दुसरीकडे सगुणीला बाजूला सारून हिराबाई भाकरी भाजण्यासाठी चुलीजवळ बसते आणि अवीट गोडीच्या भाकऱ्या हिराबाई भाजते. दरम्यान चंद्राबाईचा मुजऱ्याचा कार्यक्रम सुरु होतो. त्या संधीचा फायदा घेत रात्री हिराबाई लपून घराबाहेर पडतात. एवढ्या रात्री हिराबाई नक्की कुणाला भेटायला जात आहेत तेही घरच्यांची नजर चुकवून हे बघण्यासाठी उद्याचा एपिसोड आवर्जून बघा.