प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Updated: Jun 12, 2022, 04:20 PM IST
प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज title=

मुंबई : 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री नाल्व्हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे तिने शेअर केलेली पोस्ट. भाग्यश्रीने शेअर करणारी पोस्ट चिंताजनक आहे. या पोस्टमध्ये भाग्यश्रीने गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं सांगितलं आहे. या संदर्भातली एक पोस्ट देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर  शेअर केली आहे. यामुळे चर्चा होताना दिसत आहे.  

 शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री अतिशय भावनिक झाल्याचं दिसत आहे. ती या पोस्टमध्ये म्हणत आहे की, मी कधीही सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत नाही. मात्र आज मला थोडी भीती वाटत आहे. त्यामुळे मी ही गोष्ट आपल्याला सांगत आहे. आज माझा एम आर आय करण्यात आला.

त्यामुळे आता उद्या काय होईल हे मी सांगू शकत नाही. कदाचित माझा आजचा हा शेवटचा दिवस आहे, असं ती म्हणाली. माझ्यासाठी प्रार्थना करा, असं लिहून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सच मे पता नही जिंदगी कब बदल जाये, जी भर के जिओ' या गाण्याच्या ओळी भाग्यश्री हिने शेअर केल्या आहेत.

या अभिनेत्रीला पेन्सोमनिया या आजाराने ग्रासलं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला खूप विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. म्हणूनच अभिनेत्रीने तिच्या हातातली सगळी कामं सोडली आहेत. आणि अध्या ती रजेवर आहे.

सध्या तिचे कुटुंबीय तिची काळजी घेत आहेत. अभिनेत्रीला होत असलेल्या वेदना खूप जास्त आहेत. मात्र आता औषधोपचार घेऊन तिची प्रकृती स्थिरावली आहे. पण तिला होणारा त्रास पूर्णतः मिटलेला नाही. त्यामुळे ती स्वतः ला कुठेतरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

याआधी भाग्यश्रीला आपण कुंकू टिकली टॅटू, पुण्यश्लोक अहिल्याबाईसह अनेक मालिकांमध्ये आपण काम करताना पाहिलं आहे.