भाऊ कदम जेव्हा शाहरुख खान बनतो...

जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अनुष्का आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना याआधीदेखील रब ने बना दी जोडी, जब तक है जान यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. अनुष्का आणि शाहरुखची सुपरहिट जोडी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी शाहरुख आणि अनुष्का सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे.

Updated: Jul 29, 2017, 01:17 PM IST
भाऊ कदम जेव्हा शाहरुख खान बनतो... title=

मुंबई : जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अनुष्का आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना याआधीदेखील रब ने बना दी जोडी, जब तक है जान यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. अनुष्का आणि शाहरुखची सुपरहिट जोडी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी शाहरुख आणि अनुष्का सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे.

चला हवा येऊ द्या मंचावर यासाठी दोघेही सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. तेव्हा भाऊ कदमने एसआरकेची भूमिका साकारली आणि सगळ्यांनाच पोट धरुन हसवलं.

पाहा व्हिडिओ