'भूल भुलैया 3' संपला तरी थिएटर सोडू नका, दुसरा क्लायमॅक्स मिस कराल! अक्षय कुमारचीही एंट्री...

Bhool Bulaiyaa 3 Duble Cimax :  'भूल भुलैया 3' चित्रपट पाहण्याचा आहे प्लॅन... तर काही झालं तरी थिएटर सोडू नका कारण आहेत दोन क्लायमॅक्स

दिक्षा पाटील | Updated: Oct 11, 2024, 07:09 PM IST
'भूल भुलैया 3' संपला तरी थिएटर सोडू नका, दुसरा क्लायमॅक्स मिस कराल! अक्षय कुमारचीही एंट्री... title=
(Photo Credit : Social Media)

Bhool Bulaiyaa 3 Duble Cimax :  भुलैया 3' च्या ट्रेलरनं सगळ्यांना आश्चर्य झालं आणि त्यानं हे सिद्ध केलं की हा वर्षातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेला चित्रपट का आहे. ट्रेलरची सगळीकडेच चर्चा रंगली आहे आणि फक्त 24 तासात या ट्रेलरला 53 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. खरंतर हा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त पाहिलेला ट्रेलर आहे. 'भूल भुलैया 3' ला घेऊन सगळ्यात जास्त उत्साह वाढला आहे. चित्रपटाविषयी काही मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत. अशी एक गोष्ट समोर आली आहे की चित्रपटाच्या कास्टला क्लायमॅक्स काय असणार आहे हे माहित नव्गतं आणि दिग्दर्शक अनीस बज्नीनं चित्रपटासाठी दोन वेगळे क्लायमॅक्स शूट केले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी खुलासा केला आहे. 

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत Anees Bazmee यांनी सांगितलं की प्रेक्षकांना आश्चक्य होईल आणि ते विचार करतील की बापरे हे काय! आम्ही एक चांगला आणि सुंदर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी, आम्ही दोन वेगळे क्लायमॅक्स शूट केले आणि प्रोडक्शन टीमच्या लोकांनी देखील माहित नाही की क्लायमॅक्स कोणता असणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'भूल भुलैया 3' च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यनला रुह  बाबाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. मंजुलिका झालेल्या विद्या बालन देखील यात आहे. जी रुह बाबाच्या समोर आल्याचे दिसते. तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा आणि राजपाल यादवसोबत अनेक सेलिब्रिटी या चित्रपटात आहेत. अनीस बज्मी यांनी पुढे सांगितलं की 'कास्टनं फक्त प्री-क्लायमॅक्सपर्यंतचा चित्रपट पाहिला आहे. त्यांनी सांगितलं की फक्त मी आणि टीमच्या दुसऱ्या तीन मेंबर्सनं चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिला आहे. आम्ही दोन क्लायमॅक्स शूट केले आणि टीमला हे देखील माहित नाही की असं का करण्यात आलं. सुरुवातीला आम्ही शेवटचा क्लायमॅक्स शूट केला पण नंतर मी टीमला पुन्हा एकदा बोलावलं आणि म्हटलं की मज्जा आली नाही, पुन्हा करूया. टीमला वाटलं की हा शेवटचा क्लायमॅक्स असेल, हे सगळं फक्त क्लायमॅक्सला त्यांच्यापासून सीक्रेट ठेवण्यासाठी होतं.'

अनीस बज्मी यांनी स्क्रिप्टच्या शेवटचे 15 पेज कलाकारांना दिलेच नाही कारण प्रेक्षक आणि कलाकार दोघांसाठी हे रहस्य ठेवायचं होतं. त्यांनी दोन्ही क्लायमॅक्स शूट करताना फक्त क्रूच्या एका छोट्या ग्रुपलाच फक्त सेटवर राहण्याची परवाणगी होती. 

हेही वाचा : हिरोच्या मित्राची क्षुल्लक भूमिका होती, अख्खा चित्रपट एकट्याने खाल्ला! बिग बींचा तो चित्रपट कोणता?

अनीस बज्मीनं सांगितलं की 'भूल भुलैया' चं भविष्य हे सरप्राइजनं असणार आहे आणि ते नक्कीच अक्षय कुमारला या फ्रेंचायझीमध्ये घेण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी सांगितलं की एक चांगली स्टोरी असायला हवी, जी अक्षयला चित्रपटात येण्यासाठी भाग पाडेल. असं होऊ शकतं की अक्षय कुमारचा 'भूल भुलैया 3' मध्ये कॅमियो असवा. जसं अनीस बज्मी यांनी सांगितंल की 'भूल भुलैया 3' चे दोन क्लायमॅक्स आहेत, तर असं असू शकतं की त्यात कशात अक्षय कुमार आहे.