मुंबई : उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. कधी ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहते, तर कधी तिची ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येते. उर्फी अलीकडेच बिग बॉसच्या ओटीटी घरातून बाहेर पडली आहे. ती बीग बॉसमधून बाहेर येताच सोशल मीडिया सेन्सेशन झाली, तिच्या आयुष्यातील या प्रवासाबद्दल उर्फी म्हणते की, मला माहित आहे मी खूप अमेझिंग आहे, बिग बॉसने माझी ही गुणवत्ता पाहिली नसेल, पण जगाला कळले आहे की, मी खूप एन्टरटेनिंग आहे. परंतु आता हा बीग बॉसचा लॉस आहे, जगाने मला ओळखलं आहे आणि हेच माझ्यासाठी खूप आहे.
उर्फी म्हणते की, मी माझ्या करिअरची सुरूवात सात वर्षांपूर्वी केली. मी अनेक डेलीसोप्स देखील केले आहेत, परंतु तरीही त्यामुळे मला कोणीही ओळखत नाही. परंतु मला ओळख मिळाली ती इंस्टाग्राम आणि माझ्या कपड्यांमुळे.
उर्फी म्हणाली मी माझ्या कपड्यांमुळे इंस्टाग्रामवर कपडे आणि फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चत राहिली. परंतु तिच्या टीव्हीच्या अनुभवाबद्दल ती म्हणाली की, "मला टीव्ही इंडस्ट्रीकडून फारसा चांगला अनुभव आला नाही, मला बऱ्याचदा न सांगता शोमधून काढले गेले, तर काही वेळा शोच बंद झाले ज्यामुळे मला माझे काम दाखवण्याची संधी मिळाली नाही."
उर्फी म्हणाली की, आज मला जी काही प्रसिद्धी मिळाली आहे त्याबद्दल सांगण्यात मला संकोच नाही की, हे फक्त त्याच्या कपड्यांमुळेच मिळाली आहे. आता लोक माझ्या प्रतिभेपेक्षा माझ्या ड्रेसिंग सेन्सबद्दल अधिक बोलतात. मी या इंडस्ट्रीचा मुख्य फंडा शिकली आहे. जे दिसतं ते विकतं. मी याला फक्त पॉझिटीव्हली घेतो.
पुढे उर्फी अशी ही म्हणाली की, आज लोकं जरी माझ्या कामाबद्दल बोलत नसले, तरी भविष्यात ते माझ्या कामाचे कौतुक नक्की करतील याची मला खात्री आहे. तुम्ही बघा, मी सात वर्षापासून या इंडस्ट्रीत आहे, परंतु माझ्या कामाबद्दल कधीही चर्चा झाली नाही, पण माझ्या कपड्यांवरुन चर्चा होत आहे, जे आहे ते चांगलं आहे मी खूष आहे.