Guess Who: फोटोतल्या लहान मुलानं घर चालवण्यासाठी हॉटेलमध्ये केलं काम, आज शाहरूख-सलमान-आमिरलाही देतोय टक्कर

Bollywood Khiladi Childhood Photo: कलाकारांना संघर्ष हा काही नवा नाही. सध्या अशाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीची चर्चा आहे. त्याचा लहानपणापासूनचा (Celebrity Childhood Photo) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. 

Updated: Mar 1, 2023, 07:12 PM IST
Guess Who: फोटोतल्या लहान मुलानं घर चालवण्यासाठी हॉटेलमध्ये केलं काम, आज शाहरूख-सलमान-आमिरलाही देतोय टक्कर title=
bollywood actor akshay kumar childhood photo goes viral on internet

Bollywood Khiladi Akshay Kumar: बॉलिवूडमध्ये संघर्ष हा कुणालाच चुकला नाही. आज सिनेसृष्टीत जे मोठे कलाकार पाहायला मिळतात तेही संघर्षाशिवाय (Bollywood Celebrity Struggle Life) पुढे आलेले नाहीत. त्यामुळे यशस्वी झाल्यानंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या संघर्षाबद्दल सांगताना दिसतात. त्यांचे चाहतेही अनेकदा अशा स्टोरीज ऐकून भावूक होताना दिसतात. आपल्या आठवणींमध्ये आणि आपल्या कटू संघर्षाबद्दल सेलिब्रेटीही हळवे होताना दिसतात. असा एक अभिनेता आहे ज्याचा (Akshay Kumar) संघर्षही फार मोठा राहिलेला आहे, आज तो कलाकार बॉलिवूडमधला सर्वात लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेता ठरला आहे. फोटोत तुम्ही एका गोंडस लहान मुलाचा फोटो पाहू शकता. त्या फोटोमध्ये तो अभिनेता आहे ज्याचे आज आपण सगळेच चाहते आहोत. त्याचा असा एकही चित्रपट नसेल जो आपण पाहिला नसेल. 

सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे व्हायरल होताना दिसतात. त्यातच प्रेक्षकांनाही असे फोटो पाहायला आणि त्याखाली कमेंट करायला आवडतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की हा छोटासा मुलगा कॅमेऱ्याकडे पाहून गोंडस स्माईल देतो आहे. हा फोटो ब्लॅक एन्ड व्हाईटमध्ये आहे. तुम्ही या लहानश्या मुलाला ओळखू शकलात का? हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अक्षय कुमार आहे. इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे अक्षय कुमारलाही (Akshay Kumar as Waiter) कुठलाच संघर्ष चुकला नाही. अगदी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यापासून ते कुंदनची ज्वेलरी विकेपर्यंत (Akshay Kumar as Kundan Jewellary Seller) अक्षय कुमारनं आपला संघर्ष अनेकदा मुलाखतीतून सांगितला आहे. 

प्रेक्षकांचा हिरो 

अक्षय कुमारचं फॅन फॉलोइंग आजही खूप मोठं आहे. 30 वर्षांपुर्वी अक्षय कुमारनं (Akshay Kumar Completes 30 Yea बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. इतकी वर्षे या इंडस्ट्री टिकून राहणं हे काही सोप्पं काम नाही. त्याासाठी फार मोठी मेहनत आणि संघर्ष करावा लागतो. विनोदी भुमिकांपासून ते गंभीर भुमिकांपर्यंत अक्षय कुमारच्या सगळ्याच भुमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. असा एकही चित्रपट नसावा अक्षय कुमारचा जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नसेल. परंतु गेले काही दिवस बायकॉटचा ट्रेण्ड फिरू लागल्यानं अक्षय कुमारच्या चित्रपटांनाही गेल्या काही महिन्यांपासून उतरती कळा लागली आहे. 

अक्षय कुमारचा 'सेल्फी' बॉक्स ऑफिसवर फिका? 

अक्षय कुमारचे चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर आपटता दिसत आहेत. सुर्यवंशी हा 2021 साली दिवाळीत प्रदर्शित झालेला चित्रपट पाहता अक्षय कुमारच्या रक्षाबंधन आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सेल्फी' या इमरान हाश्मीसोबतच्या (Imran Hasmi) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Selfie Box Office Collection) फारशी कमाई केली नसून सध्या त्याच्या या चित्रपटांना उतरती कळा लागली आहे. सेल्फी या चित्रपटानं आत्तापर्यंत 10 कोटीही कमावले नसून पहिल्या ऑपनिंग हा चित्रपट संपुर्णपणे फिका गेला होता.