चित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य

हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे. 

Updated: Apr 21, 2020, 05:44 PM IST
चित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे. 

Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊऩ असल्यामुळे शाहरुखसुद्धा त्याच्या घरातच  निवांत आहे. पण, या काळातही तो चाहत्यांपासून मात्र दुरावलेला नाही. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीप्रमाणेच यावेळीसुद्धा #AskSRK या अनोख्या सत्राद्वारे ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्येच त्याने आपल्या निवृत्तीविषयीसुद्धा काही गोष्टी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं. 

आपण या कलाविश्वात कोणी सुपरस्टार नसल्याचं म्हणत आपण किंग, अर्थात बादशाह असल्याचं शाहरुखने यावेळी सांगितलं. त्याचवेळी चाहत्यांशी संवाद साधत असताना एका नेटकऱ्याने आता शाहरुखने कलाविश्वातून निवृत्ती घ्यावी  असा सल्ला दिला. त्याचा हा सल्ला वाचून किंग खानने दिलेलं उत्तर पाहण्याजोगं होतं. 'मला ठाऊक नाही.... तू हे एका सुपरस्टारला विचारलं आहेस अरे..... दुर्दैवाने मी तर फक्त एक बादशाह आहे', अशा शब्दांत बी- टाऊनचा हा किंग खान उत्तरला. 

 

शाहरुखचं निवृत्तीच्या प्रश्नावर आलेलं हे उत्तर पाहता, किमान येत्या काळात काही तो कलाविश्वाला रामराम ठोकणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांनी नाराज होण्याची काहीच कारण नाही.