रणबीरवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आलियाने लढवली ही शक्कल

ही सेलिब्रिटी जोडी... 

Updated: Mar 5, 2020, 01:45 PM IST
रणबीरवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आलियाने लढवली ही शक्कल  title=
आलिया भट्ट, रणबीर कपूर

मुंबई : रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर करता करता अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना साथ देण्याचा निर्णय केला. गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असणारी ही सेलिब्रिटी जोडी येत्या काळात विवाहबंधनातही अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

सुरुवातीचे काही दिवस हे नातं गुलदस्त्यात ठेवल्यानंतर आलिया आणि रणबीरने आता मात्र त्यांच्या या नात्याचा सर्वांसमक्ष स्वीकार केला. विविध कार्यक्रम म्हणू नका किंवा मग एखादा कौटुंबीक सोहळा, प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय ठरते ती म्हणजे रणबीर आणि आलियाची खऱ्या आय़ुष्यातील केमिस्ट्री. 

आलियानेही कायमच या नात्याचा आदर करत रणबीर आपल्या आयुष्यात नव्हे, तर कारकिर्दीतही रणबीरचं महत्त्वाचं स्थान सर्वांसमक्ष मांडलं आहे. क्षणोक्षणी ती त्याच्याप्रती आपलं प्रेम व्यक्तही करत असते. याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोने आला आहे. ज्यामध्ये एका कार्यक्रमाला आलिया पोहोचली असता सहाजिकच तिच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. यातच जेव्हा तिच्या फोनवर काहींचं लक्ष गेलं, तेव्हा त्यामध्ये चक्क रणबीरचीही झलक पाहायला मिळाली. 

आलियाच्या मोबाईलवर असणाऱ्या वॉलपेपरमध्ये रणबीरसोबतचा तिचा एक रोमँटिक अंदाजातला फोटो पाहायला मिळत आहे. बी- टाऊनमध्ये सध्या मोस्ट हॅपनिंग कपलच्या यादीत असणारी ही जोडी आणि त्यांच्या प्रेमळ नात्याची ही अनोखी बाजू पाहता, आता ते कधी एकदा विवाहबंधनात अडकणार याविषयीचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

 
 
 
 

A post shared by RANBIRALIAA (@ranbir_aliaa) on

दरम्यान, एकिकडे लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच दुसरीकडे 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या तयारीत आलिया आणि रणबीर व्यग्र आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटातून ते अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासोबत झळकणार आहेत.