मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्यासाठीची कारणं एका नावाभोवती सर्वाधिक फिरत आहेत. हे नाव आहे सुकेश चंद्रशेखर याचं. काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखर याच्याोबतचे तिचे काही खासगी फोटो व्हायरल झाले. ज्यानंतर ती सर्वांनाच खासगी आयुष्य, आणि गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करताना दिसली.
मानसिकदृष्ट्या हादरवून टाकणाऱ्या या परिस्थितीतून सध्या जॅकलिन बऱ्याच मार्गांनी स्वत:ला सावरु पाहत आहे.
परिस्थितीपुढे हतबल असली तरीही ती यातून बाहेर पडण्यासाठी आता महत्त्वाची पावलं उचलताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी जॅकलिन सेल्फ हेल्प आणि काही आध्यात्मिक पुस्तकं वाचत असल्याचं म्हटलं जात आहे.
शिवाय ती सध्या जर्नलिंगही करत आहे. ज्यामध्ये रोजनिशी अर्थात डायरी लिहिणं, काही कल्पना आणि विचार लिहिणं याचा समावेश आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार जॅकलिन आधीपासूनच अध्यात्माकडे कल असणाऱ्यांपैकी एक होती असं तिच्या निकटवर्तीयंचं मत.
जर्नलिंगवर तिचा फार विश्वास आहे. ज्यामुळं ती हे तंत्र बऱ्याच काळापासून अवलंबताना दिसत आहे.
ध्यानधारणा आणि श्वसनाचे व्यायाम करण्यावरही तिचा भर असतो. थोडक्यात काय, तर कठीण काळातही जॅकलिन बहुविध मार्गांनी स्वत:ला सावरताना दिसत आहे.
प्रतिमा मलिन होईल असं काही करु नका...
काही दिवसांपूर्वीच जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखरचा एक रोमँटिक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये तिच्या मानेवर दिसणाऱ्या लव बाईटनं सर्वांच्या भुवया उंचावल्या.
फोटो व्हायरल होताच या बॉलिवूड अभिनेत्रीला जोरदार ट्रोल करण्यात आलं.
हे पाहून तिनं एक पोस्ट लिहिली, जिथं आपण सध्या कठीण प्रसंगातून जात असल्याची कबुली तिनं दिली.
माधम्यांच्या प्रतिनिधींना विनंती करते की असे फोटो पसरवू नका जे माझ्या खासगी आयुष्यावर आणि गोपनीयतेवर परिणाम करतील.
आपल्या प्रियजनांशी तुम्ही असं कधीच वागणार नाही, मी आशा करते की माझ्याशीही तुम्ही असं वागणार नाही, अशी आर्जव तिनं केली होती.