करिना- सैफची मुलं त्यांच्या आजीला पाहूच शकणार नाहीत; कुटुंबाचा अजब नियम

शर्मिला यांच्या चित्रपटांवर मिळणारी ही प्रतिक्रिया बहुधा पिढ्यांमध्ये असणाऱ्या अंतरामुळं असावी.   

Updated: May 16, 2022, 03:01 PM IST
करिना- सैफची मुलं त्यांच्या आजीला पाहूच शकणार नाहीत; कुटुंबाचा अजब नियम  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर तब्बल 11 वर्षांनंतर हिंदी चित्रपटांतून पुन:पदार्पण करण्यास तयार आहेत. शर्मिला चित्रपटांमध्ये सक्रिय नसल्या, तरीही त्यांचा मुलगा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर हे मात्र बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं दिसून आलं. 

तिथं शर्मिला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला, ही बाब कोणीच नाकारत नाही. त्यांचे काही चित्रपट नात इनाया हिनं पाहिले आणि ती व्यक्तही झाली. पण, करिना आणि सैफची मुलं, जे आणि तैमुर यांना मात्र आपले चित्रपट पाहण्याची परवानगी नाही, असंही त्या म्हणाल्या. (Saif Ali khan kareena kapoor son)

दोन्ही नातवंडांनी आपले चित्रपट पाहिल्यास फारच अडचणी निर्माण होतील, असंच त्यांचं मत. सारा आणि इब्राहिम आणि जेव्हा जेव्हा आपले चित्रपट पाहतात तेव्हा 'Well done' इतकंच म्हणतात. (Taimur Jeh )
 
त्या दोघांकडेही चित्रपट पाहिल्यानंतर बोलण्यासाठी काहीच नसतं, असंही त्या म्हणाल्या. शर्मिला यांच्या चित्रपटांवर मिळणारी ही प्रतिक्रिया बहुधा पिढ्यांमध्ये असणाऱ्या अंतरामुळं असावी. 

मुद्दा असा, की कुटुंबात इतकी ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री असताना तैमूर आणि जे या दोघांनाही त्यांच्या आजीच्या कलाकृती कधी बरं पाहता येणार ?