किडनीच्या कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री हुमा कुरेशी हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली.
‘ही अतिशय दु:खद बातमी आहे, आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कल्पना लाजमी यांनी अखेरचा श्वास घेतला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो’, असं तिने ट्विटरमध्ये लिहिलं.
Deeply saddened... at around 4:30 am today morning #KalpanaLajmi passed away .. May she rest in peace.
— Huma Qureshi (@humasqureshi) September 23, 2018
तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांच्या दिग्दर्शिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ‘एक पल', 'रुदाली', 'चिंगारी', 'दमन' या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.
Our dear beloved friend Kalpana Lajmi has gone to a better place. RIP my darling Kalpan. I shall miss you so terribly.
— Soni Razdan (@Soni_Razdan) September 23, 2018
प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांची मुलगी आणि गुरुदत्त यांची भाची असणाऱ्या कल्पना यांनी सहाय्यक दिग्दर्शनातून या कलाविश्वात पदार्पण केलं. श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.