मुंबई : अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सध्या बॉक्स ऑफिसवर अनेकांचं लक्ष वेधत आहेत. रविवारी या चित्रपटाने २६.०८ कोटींचा गल्ला जमवला ज्यामुळे आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे ६१.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर आणले. ओम राऊत दिग्दर्शित Tanhaji The Unsung Warrior या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या एका असामान्य मोहिमेवर प्रकाशझोत टाकण्यात आला. ज्यामध्ये तान्हाजी मालुसरे यांचं कार्य भव्य रुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं.
#Tanhaji roars on Day 2... Metros *and* mass belt, multiplexes *and* single screens, #Tanhaji is simply remarkable... #Maharashtra is record-smashing... Other circuits - decent on Day 1 - join the celebrations on Day 2... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr. Total: 35.67 cr. #India biz
— taran adarsh (@taran_adarsh) January 12, 2020
सैफ अली खान, अजय देवगन, काजोल, शरद केळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या Tanhaji The Unsung Warrior या चित्रपटाने दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या चित्रपटाला तगडं आव्हान दिलं आहे. सुरुवातीला या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत काहीसा कमी वेग पकडला होता. पण, शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा 'छपाक'लाही काही बाबतीत फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
#Chhapaak witnesses an upward trend on Day 2, but the 2-day total is underwhelming... Decent at premium multiplexes, but unable to connect *and* collect beyond metros... Needs to cover lost ground on Day 3... Fri 4.77 cr, Sat 6.90 cr. Total: ₹ 11.67 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 12, 2020
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' या चित्रपटामध्ये लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड हल्ला पीडितेच्या संघर्षावर आणि तिच्या जिद्दीवर प्रकाश टाकणारी कथा साकारण्यात आली आहे. समीक्षकांनी दीपिकाच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असला, तरी प्रेक्षकांचा कल मात्र 'तान्हाजी..'कडेच दिसत आहे. एकिकडे चर्चा आणि गाजावाजा होऊनही कमाईच्या बाबतीत 'छपाक' Chhapaak काहीसा मागे पडल्याचं दिसत असतानाच दुसरीकडे 'तान्हाजी'ची घोडदौड मात्र चांगल्या वेगाने सुरु आहे हे खरं.