Gauri Khan in Coffee With Karan: आजकाल पालकांमधला आणि मुलांमध्ये संवाद पारदर्शक होतो आहे, तेव्हा डेटिंग, रिलेशनशिप्स (Dating and Relationships) याबद्दल मुलंही एखाद्या मित्राप्रमाणे आपल्या आईवडिलांना सगळंच मोकळेपणानं सांगताना दिसत आहेत. आईवडिलदेखील आपल्या पाल्यांना रिलेशनशिपसारख्या कॉप्लिकेटेड विषयावर मोकळेपणानं बोलताना दिसत आहेत. सर्वसामान्य पालकही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहताना दिसत आहेत. (bollywood producer gauri khan gives dating advice for son abram khan in karan johar popular show coffee with karan)
बॉलीवूडमध्ये सध्या डेटिंग आणि रिलेशनशिप्सच्या सतत चर्चा होताना पाहायला मिळतात. सारा अली खान (Sara Ali Khan), अनन्या पांडे (Ananya Pandey), जान्हवी कपूर (Janhavi Kapoor), सुहाना खान (Suhana Khan), शनाया कपूर (Shanaya Kapoor) असे स्टार कीड्स सध्या बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत आहेत. त्यातून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा इंटरनेटवर झाल्या नाहीत तरच नवल! या स्टार कीड्सचे पालकही त्यांच्या मुलांच्या डेटिंगबद्दल खुलेआपपणे बोलताना दिसतात. कॉफी विथ करन (Coffee with Karan) हा शो सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतो आहे. नुकत्याच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये शाहरूख खानची पत्नी गौरी खाननं (Shahrukh Khan Wife Gauri Khan) हजेरी लावली होती. यावेळी गौरी खाननं आपल्या मुलाबद्दल म्हणजेच आर्यनबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
करण जोहरच्या या शोमध्ये नेहमीच डेटिंग आणि रोमान्सवर प्रश्न विचारले जातात. यंदाही शोमध्ये आलेल्या गौरी खानला करण जोहरनं असाच एक प्रश्न विचारला. त्यानं गौरीला विचारलं की, तु आर्यन खानला डेटिंगबद्दल काय सल्ला देशील? यावर गौरीनं उत्तर दिलं की मी त्याला असं सांगेन की लग्न होईपर्यंत जेवढ्या मुलींना तुला डेट करावसं वाटेल तेवढे कर आणि त्यानंतर थांब आणि सुहानाला सल्ला असेल की दोन मुलांना एकत्र एकाच वेळी डेट करू नकोस.
डेटिंगबद्दल दिलेला असा सल्ला सुहाना आणि आर्यन खान पाळतील का हा जरी प्रश्न असला शाहरूखचंही हे ऐकून डोकं फिरेल का? हाही तितकाच रंजक प्रश्न आहे. शाहरूख खान सध्या आपल्या जवान (Jawan) आणि पठान (Pathan) चित्रपटाच्या तयारीसाठी लागला आहे. लवकरच तो या चित्रपटाचं प्रमोशन करायला मीडियासमोर येण्याची अपेक्षा आहे. मध्यंतरी शाहरूख खानच्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचे फोटो व्हायरल होत असतात.