गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी

Boney Kapoor : बोनी कपूर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी केली हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी, डोक्यावर केस उगवण्याविषयी सांगत जाहिर केला आनंद 

दिक्षा पाटील | Updated: Feb 23, 2024, 04:49 PM IST
गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी title=
(Photo Credit : Social Media)

Boney Kapoor : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर यांनी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सगळ्यांनी त्यांची स्तुती केली होती. या सगळ्यानंतर आता बोनी कपूर यांनी चांगलं दिसण्यासाठी हेअर ट्रान्सप्लॉन्ट करण्याचा निर्णय घेतला. एका कार्यक्रमानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी हा खुलासा केला. 

हैदराबादमध्ये एका कार्यक्रमानिमित्तानं बोनी कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी' फ्री प्रेस जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की "आता माझ्या डोक्यावर टक्कल राहणार नाही, केस येतील, किती मस्त! आता पर्यंत मला आलेला अनुभव चांगला आहे. आता चांगल दिसण्यासाठी मी घेतलेली ट्रिटमेंट किती मदत करेल हे पहावं लागेल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बोनी कपूर हे नेहमीच त्यांच्या मुलांविषयी बोलताना दिसतात. काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी त्यांची लेक जान्हवीच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी सांगितले होते. 'आयड्रीम मीडिया'शी बोलताना बोनी कपूर यांनी सांगितलं की "जान्हवीनं ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपटाची शूटिंग केली आहे. आता राम चरणसोबत चित्रपट करणार आहे. याशिवाय ती सूर्यासोबत देखील हिंदीमध्ये एक चित्रपट करणार आहे. माझी इच्छा आहे की तिनं सगळ्या प्रकारचे चित्रपट करायला हवे."

इतकंच नाही तर या सगळ्या आगामी प्रोजेक्ट्सवर जान्हवी कपूरची रिअॅक्शन कशी होती हे विचारता बोनी कपूर म्हणाले, "ती खूप आनंदी आहे. ती सध्या स्टार्सची फॅन आहे आणि ही संधी मिळाल्यानंतर तिला खूप आनंद होतोय, महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यासाठी ती आभारी आहे. तिचे सध्या फक्त हेच विचार आहेत की हे चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी करतील." जान्हवी आणि ज्युनियर एनटीआर या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर ते दोघं देवारा या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 

हेही वाचा : 'डेटवर गेल्यानंतर बिल पे करणाऱ्या मुली मूर्ख!' डेटिंगबाबत जया बच्चन यांचा महिलांना सल्ला

बोनी कपूर यांच्या विषयी बोलायचे झाले तर पहिलं लग्न मोना शौरीसोबत झालं होतं. त्यानंतर त्यांना श्रीदेवी यांच्यावर प्रेम झालं आणि त्यांनी 1996 मध्ये श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुली असून जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशी त्यांची नावं आहेत. तर 2018 मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले.