Junaid Sami Shocking Revelation : मूळचा पाकिस्तानचा असलेल्या गायक अदनान सामीने भारतीय नागरित्व (Indian citizenship) घेतल्यापासून तो सातत्याने चर्चेत असतो. मात्र आता अदनान सामी (Adnan Sami) नव्या वादात सापडला आहे. गायक अदनान सामीवर त्याचा भाऊ जुनैद सामी खान (Junaid Sami) याने गंभीर आरोप केले आहेत. यासोबत अदनानबाबत अनेक मोठे दावे देखील केले आहेत. जुनैदने अदनानी सामीला सगळ्यात मोठा खोटारडा म्हणत त्याच्यावर अनेक मोठे आरोपही केले आहेत. अदनान तुरुंगातही जाऊन आल्याचे जुनैदने म्हटले आहे. तसेच अदनानने भारतीय नागरिकत्व का घेतले याचं कारणही सांगितले आहे.
सोशल मीडिया पोस्टद्वारे जुनैद सामीने हे गंभीर आरोप केले आहेत. KoiMoi मधील एका वृत्तानुसार, "इमरान खान बनण्याची वेळ आली आहे आणि आता मला माझा मोठा भाऊ अदनान सामीबद्दल अनेक सत्ये सांगायची आहेत. मला आता देवाशिवाय कोणाचीच भीती वाटत नाही. मला हे करायला आवडणार नाही पण आता मला ते करावंच लागेल. कारण सत्य बाहेर येणं खूप महत्त्वाचं आहे. मी अदनान सामीला आव्हान देतो की, मी जे काही बोललोय त्यातील एकतरी गोष्ट खोटी आहे असे सांगावे," असे जुनैद सामीने म्हटलं आहे.
'अदनानचा जन्म 15 ऑगस्ट 1969 रोजी रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला. तर 1973 मध्ये याच रुग्णालयात माझा जन्म झाला. त्यामुळे त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला ही माहिती खोटी आहे. तो इंग्लंडमध्ये ओ-लेव्हल्समध्ये नापास झाला आणि त्याने लाहोरमधून पदवी मिळवली. अबू धाबी येथून त्याने खाजगीरित्या ए लेव्हल केले, असा आरोप जुनैदने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे. यासोबत अदनानच्या वैयक्तिक आयुष्यावरही जुनैदने भाष्य केले आहे.
अदनानने त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत अश्लील डीव्हीडी बनवले असल्याचा गंभीर आरोप जुनैदने केला आहे. "हा मुद्दा मला कमजोर करतो. मी माझ्या गर्लफ्रेन्डसोबतही हे करू शकत नाही. पण अदनान सामीने त्याची दुसरी पत्नी सबासोबत 2007-2008 मध्ये अश्लिल व्हिडीओंची डीव्हीडी बनवली होती. पती-पत्नीमध्ये बरेच काही घडते, पण ते केवळ स्वतःपुरते ठेवले पाहिजे. अदनानने या डीव्हीडी कोर्टात दिल्या, जेणेकरून संपूर्ण भारताला त्या पाहता यावा आणि त्या त्याने नसून सबाच्या प्रियकराने बनवल्या असल्याचे सांगितले. हे सर्व खोटे आहे. सबा कोर्टात बेशुद्ध पडल्याची मला माहिती मिळाली होती," असेही जुनैदने म्हटलं आहे.
अदनानने भारतीय नागरिकत्व घेतले कारण येथे त्याला चांगले पैसे मिळतात, जे पाकिस्तानमध्ये मिळत नाहीत. आपली आई भारतीय नसून पाकिस्तानी असल्याचेही जुनैदने म्हटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जुनैदने काही वेळाने त्याची सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली.
दरम्यान, 2016 मध्ये अदनान सामीने भारताचे नागरिकत्व मिळवले होते. मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्याला भारतात राहू देण्यात यावे, अशी विनंती करत अदनान सामीने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मूअदनान सामी 13 मार्च 2001 रोजी पहिल्यांदा पर्यटक व्हिसावर भारतात आला होता. त्यानंतर भारतीय नागरिकत्वासाठी त्याने अर्ज केला होता.