Ankur Wadhave: बायकोला पहिल्या अन् शेवटच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं... अंकूर वाढवेची 'ती' पोस्ट व्हायरल

Ankur Wadhave Instagram Post: अंकूरनं या पोस्टमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. यामध्ये त्यानं लग्नसंस्थेवरील अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

Updated: Feb 23, 2023, 10:27 PM IST
Ankur Wadhave: बायकोला पहिल्या अन् शेवटच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं... अंकूर वाढवेची 'ती' पोस्ट व्हायरल title=

Ankur Wadhave Instagram Post: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या रिएलिटी शोनं अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. यातील बरेच कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर गेले आहेत. त्यातलाच एक लोकप्रिय अभिनेता म्हणजेच अंकुर वाढवे. अंकुर वाढवे (Ankur Vadhave) यानंही अल्पावधीतच महाराष्ट्रातील प्रत्येक चाहत्यांच्या मनामनात घरं केलं आहे. शरीरानं उंची कमी असली तरी अकूंरनं आपल्या समोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना सामोरं जात यशाचे शिखर गाठले आहे. अंकूर हा सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे त्यामुळे तोही आपले अपडेट्स हे तो आपल्या इन्टाग्रामवरून (Instagram) शेअर करत असतो. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. त्याची ही पोस्ट सध्या इन्टाग्रामवरून सगळीकडेच व्हायरल होते आहे. या पोस्टमध्ये अंकूरनं आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. 

अंकूरनं या पोस्टमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. यामध्ये त्यानं लग्नसंस्थेवरील अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ज्यात तो म्हणतो की, “आयुष्यात कधीही प्रेयसी भेटली नाही. एक भेटली पण Inter Caste (आंतरजातीय) म्हणून तिनं लग्नासाठी नकार दिला. यानंतर मी निर्णय घेतला कधीही लग्न करायचं नाही आणि केलं तर फक्त प्रेम विवाह करणार.” असं त्यानं आपल्या पोस्टच्या सुरूवातीला म्हटलं आहे. अंकूरनं इन्टाग्रामवर आपल्या पत्नीसह फोटो शेअर केला आहे ज्यात त्यानं ही इमोशनल पोस्ट लिहिली आहे. 

अंकूरनं पुढे लिहिलं आहे की, “ लग्न केलं तर प्रेमविवाह करणार असंच ठरवलं कारण माझं असं म्हणणं होतं की, अरेंज मॅरेजमध्ये कदाचित मुली आई-बाबांच्या दबावाखाली हो म्हणतात आणि प्रेमविवाहसाठी मला कोणी हो बोलणार नाही हेही तेवढंच सत्य. कारण प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला राजकुमार ठरलेला असतो त्यात मी बसत नाही. म्हणून ठरवलं होतं लग्न न करणंच ठीक आहे. निकिताचं स्थळ आलं आणि तिला न बोलता न भेटता हो बोललो. त्याचं कारणं अस की ती माझ्या मामाची मुलगी. तिला माझ्याबद्दल काही गोष्टी माहित होत्या.”अशी भावुक व्यथाही त्यानं मांडली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बायकोला आय लव्ह यू (I Love You) आणि.. 

आपल्या पत्नीविषयी सांगताना तो म्हणाला, “लग्न ठरण्यापूर्वी मी तिला आधी एक कॉल केला. तिला माझ्या सवयी (सगळ्या) आणि पहिली आणि शेवटची गर्लफ्रेंज बद्दलही स्पष्ट बोललो. तरीही ती हो बोलली आणि मला जशी हवी होती तशीच गर्लफ्रेंड भेटली. मित्र आहेत असतील पण किमान आतापर्यंत तरी मी तुला आणि तू मला कधीच अंधारात ठेवत नाही. कदाचित हे प्रेम विवाहमध्ये मिळालं नसतं I LOVE YOU FOREVER बायको”.