'... लेडीज हॉस्टेलचा वॉर्डन असल्यासारखं वाटतंय'; वंशाचा दिवा हवा म्हणून हे काय बोलून गेले चिरंजीवी?

चिरंजीवींच्या नातू हवा असल्याच्या त्यांच्या विधानामुळे चाहते निराश झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावरु टीका होत आहे. राम चरण आणि उपासना यांची मुलगी क्लेन कारा कोनिडेला आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभावाच्या विचारसरणीवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 13, 2025, 09:38 AM IST
'... लेडीज हॉस्टेलचा वॉर्डन असल्यासारखं वाटतंय'; वंशाचा दिवा हवा म्हणून हे काय बोलून गेले चिरंजीवी? title=

दाक्षिणात्य स्टार चिरंजीवी आपल्या एका विधानावर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. चिरंजीवी यांनी नातवाबद्दल केलेल्या विधानावर चाहते निराश झाले आहेत आणि त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. 'ब्रह्म आनंदम' च्या रिलीजपूर्व कार्यक्रमात, त्याने आपला वारसा पुढे नेऊ शकेल असा नातू असावा अशी इच्छा व्यक्त केली. हे पाहून चाहते थक्क झाले. चिरंजीवीxचा मुलगा राम चरण आणि सून उपासना यांना एक मुलगी आहे. ज्यांच्यासोबत कुटुंबाचे फोटो अनेकदा पोस्ट केले जातात. 

चिरंजीवी एका कार्यक्रमात म्हणाले, 'जेव्हा मी घरी असतो तेव्हा मला माझ्या नातवंडांभोवती असल्यासारखे वाटत नाही. मला असं वाटतंय की, मी इतक्या महिलांनी वेढलेला एक हॉस्टेल वॉर्डन आहे. मला आशा आहे आणि मी राम चरणलाही सांगतो की, जर दुसरे काही नको. पण किमान एक मुलगा असावा जो आपला वारसा पुढे नेऊ शकेल.

चिरंजीवी अडचणीत 

त्यानंतर चिरंजीवी त्यांच्या नातीबद्दल बोलले आणि म्हणाले, 'राम चरणची मुलगी माझ्यासाठी अतिशयआहे.' पण कधीकधी मला भीती वाटते की, पुन्हा मुलगी झाली तर' हे विधान ऐकून चिरंजीवीचे चाहते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणू लागले की एवढा मोठा सुपरस्टार मुलगा आणि मुलगी यात फरक करतो. आजच्या काळातही त्याला अशी इच्छा आहे. चिरंजीवीच्या नातीचे नाव क्लेन कारा कोनिडेला आहे. राम चरण आणि उपासना यांचे लग्न 2023 मध्ये झाले.

चाहते भडकले 

एका युझरने चिरंजीवी यांना असे शब्द बोलल्याबद्दल फटकारले. तो म्हणाला की, आपला आदर्श असलेल्या व्यक्तीने असं म्हणणे योग्य नाही. दुसऱ्या युझरने लिहिले की, 'चिरंजीवी गुरू यांनी असे म्हटले हे खूप दुःखद आहे. अरे, ती मुलगी आहे, तू का घाबरायचं? मुलीही वारसा पुढे चालवतात. तेही चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचं नाव पुढे नेतात.' दुसऱ्या युझरने लिहिले, 'हा खूप भयानक विचार आहे. यावरून पुरुष वारसाची किती भूक आहे हे दिसून येते.' अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळतात.

चिरंजीवींच्या दोन मुली

चिरंजीवी यांच्या पत्नीचं नाव सुरेखा आहे. दोघांची तीन मुलं आहेत. यामध्ये एक मुलगा आणि दोन मुली आहेत. राम चरण, सुष्मिता आणि श्रीजा अशी त्यांची नावे आहेत.