Ambani Family Distribute Packets In Mahakumbh: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांमधील सदस्यांसहीत महाकुंभ मेळ्यादम्यान गंगा नदीमध्ये पवित्र स्थान करण्यासाठी गेले होते. माघ पोर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी अंबानी कुटुंबाने गंगेत स्थान केलं. मुकेश अंबानींबरोबर त्यांची आई कोकिलाबेन अंबानी यांच्यासहीत दोन्ही मुलं आणि सुनाही होत्या. आकाश आणि श्र्लोक तसेच अनंत आणि राधिका या चौघांनाही देवदर्शन केलं. मुकेश अंबानींचे नातू पृथ्वी आणि वेदा हे दोघेही संपूर्ण कुटुंबाबरोबर होते.
संगमावर स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंबाने विशेष गंगा आरती केली. निरंजन आखाड्याचे महाराज आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलासानंदगिरी यांनी ही विशेष पूजा सांगितली. कोकिलाबेन अंबानी या त्यांच्या दोन मुलींबरोबर या ठिकाणी आल्या. दिप्ती साळगावकर आणि निना कोठारी या दोघींबरोबर कोकिलाबेन आलेल्या. या तिघींबरोबर मुकेश अंबानींच्या सासुबाई पोर्णिमाबेन दलाल, वहिनी ममताबेन दलाल सुद्धा होत्या. अंबानी कुटुंबाच्या या भेटीचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये आकाश आणि अनंत अंबानींबरोबर मुकेश अंबानींनी गंगेत डुबकी मारल्याचं दिसत आहे. मागील महिन्यामध्येच मुकेश अंबानींचे धाटके बंधू आणि उद्योजक अनिल अंबानी त्यांच्या पत्नीसोबत प्रयागराजमध्ये महा कुंभ सोहळ्यात सहभागी झालेले.
स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंबाने कुंभमधील पर्मार्थ निकेतन आश्रमला भेट दिली. सतानती कर्चमारी, न्हावाडे आणि भक्तांना अंबानी कुटुंबाने काही बॉक्स वाटली. या बॉक्समध्ये नेमकं काय आहे याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर दिसून आली. अखेर या बॉक्समध्ये काय आहे याबद्दलची माहिती समोर आली आहे. अंबानींनी वाटलेल्या या बॉक्समध्ये मिठाई होती. अंबानी कुटुंबाने भक्तांना अन्नदानही केलं.
Shri Mukesh Ambani and his family with Swami Chiddanand Saraswati Maharaj of Parmarth Niketan Ashram at Maha Kumbh, Prayagraj.#mahakumbh #prayagraj #ambanifamily #trivenisangam pic.twitter.com/esu4D3HWwe
— Dhanraj Nathwani (@DhanrajNathwani) February 12, 2025
रिलायन्स इंडस्ट्रीजने परमार्थ निकेतन आश्रम, शारदा पीठ मठ ट्रस्ट (द्वारका), श्री शंकराचार्य उत्सव सेवालय फाउंडेशन, निरंजनी आखाडा, आणि प्रभू प्रेमी संघ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने, कुंभामध्ये अन्न सेवा (अन्न दान) दिली. अंबानी कुटुंबाने यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. अंबानी कुटुंबाने त्यांची आणि यात्रेकरूंची सुरक्षित ने-आण करता यावी या हेतूने बोट चालकांना लाइफ जॅकेटचे वाटप केले.