'टॉप घालायला विसरलीयेस का?' मुलीला पाहिल्यानंतर चिक्की पांडेला पडला प्रश्न, कुटुंबासमोर विचारला जाब

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे सध्या 'द ट्राइब'मुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये अलानाचे वडील तिचे छोटे कपडे पाहून तिला जाब विचारत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 8, 2024, 05:15 PM IST
'टॉप घालायला विसरलीयेस का?' मुलीला पाहिल्यानंतर चिक्की पांडेला पडला प्रश्न, कुटुंबासमोर विचारला जाब title=

Alanna Panday : अलाना पांडे तिच्या नवीन शो 'द ट्राइब'चे प्रमोशन करत आहे. अलाना ही चंकी पांडेची भाची आणि अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आहे. सोशल मीडिया प्रभावशाली अलानाने इन्स्टाग्रामवर शोमधील एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये तिचे वडील चिक्की पांडे  आणि कुटुंब संभाषणासाठी जमल्याचे दिसत आहे. थोडावेळ अलानाच्या पोशाखावर विचार केल्यानंतर ते तिला विचारतात की, तु तुझा टॉप घालायला विसरली आहेस का? वडिलाचे शब्द ऐकून अलानाला धक्का बसला. यावेळी अलानाने मिंट ग्रीन ब्रॅलेट आणि सफेद ट्राउजर घातली आहे. 

वडिलांचे हे शब्द ऐकून अलाना म्हणते की, तुम्ही खरच असं बोलत आहात. यात काय चूक आहे. त्यानंतर तिचे वडील म्हणतात की, यासोबत शर्टही लागेल. हे LA नाही. ही ब्रा आहे. यावर अलाना म्हणते की ती एक ब्रॅलेट आहे. पण वडील म्हणतात की ब्रा झाकली पाहिजे. 

अलानाच्या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया 

अलानाच्या चाहत्यांच्या व्हिडीओवरील प्रतिक्रिया जरा वेगळ्या आहेत. जिथे अनेकांना वाटले की हे वडील आणि त्यांची मुलगी यांच्यातील गोड संभाषण आहे. काही लोकांनी म्हटले आहे की, अलानाने काहीसे सभ्य कपडे घालावेत. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, तिचे वडील अगदी बरोबर बोलत आहेत. कुटुंबात असताना कसे कपडे घालावे हे समजले पाहिजे. तर काही लोकांनी म्हटलं आहे की, तर काही माणसे घरी टॉपलेस फिरत असतात. एका चाहत्याने तिचा बचाव करत म्हटलं आहे की, अर्थातच! हे निश्चितपणे टॉप नाही, परंतु ब्रॅलेटसारखे आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांनी अलानाच्या व्हिडीओवर केल्या आहेत. 

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या व्हिडीओमध्ये अलविया जाफरी, सृष्टि पोरी, आर्याना गांधी और अल्फिया जाफरी के साथ-साथ डिजिटल इव्हेंजलिस्ट गुंतवणूकदार हार्दिक जावेरी यांचाही समावेश आहे. धर्माटिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन आणि करण जोहर, अपूर्व मेहता आणि अनीशा बेग यांचा 'द ट्राइब' तुमच्यासाठी लॉस एंजेलिसमधील भारतीय प्रभावशाली लोकांसोबतचा अस्पष्ट संभाषण घेऊन येतो आहे.