मुंबई : मनोरंजन विश्वातील सळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार कायम चर्चेत असतो. पण यंदाच्या ऑस्कर 2022 मध्ये असं काही घडलं जे लोकांच्या कल्पनेच्या पलीकडे होतं. कदाचित ऑस्करच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल. सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं. पुरस्कार देण्याची प्रक्रिया सुद्धा चालू झाली होती. सर्वांच्या नजरा पुरस्कार सोहळ्याकडे लागल्या होत्या.
पण त्यानंतर कार्यक्रमात काही सेकंद शांतता पसरली जेव्हा प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने प्रेजेंटर ख्रिस रॉकच्या कानाखाली वाजवली. ख्रिसने हे हलक्यात घेतलं असलं तरी विल स्मिथच्या या वागणूकीमुळे त्याच्यावर जोरदार टीका होवू लागली. विल स्मिथच्या या पंचिंग स्कँडलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेत्याकडून ऑस्कर काढून घेतला जाऊ शकतो का?
त्याच्या या वागणूकीनंतर त्याचाकडून हा पुरस्कार परत घेतला जाऊ शकतोअशी चर्चा आता सुरू झालीये. विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. मात्र सोशल मीडियावर त्याच्या पुरस्कारापेक्षा त्याच्या पंचचीच जास्त चर्चा होत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, विल स्मिथकडून त्याचा पुरस्कार परत घेतला जाऊ शकतो.
खरंतर, हा कार्यक्रम The Academy of Motion Picture Arts and Sciences आयोजित केला होता. ज्यांच्या गाईडलाईन्सनुसार, हे कोड ऑफ कन्डक्ट आहे. एका सूत्रानुसार, 'हा एक प्रकारचा हल्ला आहे. त्यावेळी सगळेच थक्क झाले होते. प्रत्येकजण खूप अस्वस्थ होते.
काय आहे प्रकरण...
खरंतर, ख्रिस रॉक डॉक्युमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. याचदरम्यान ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर कमेंट केली. त्यामुळे स्मिथला राग आला. तो स्टेजवर आला आणि त्याने ख्रिस रॉकच्या जोरात कानाखाली मारली. खरंतर, ख्रिस रॉकने G.I Jane 2 चित्रपटाबाबत विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती.
UNCENSORED WILL SMITH FOOTAGE AS SHOWN ON AUSTRALIAN TV pic.twitter.com/NcRfdjWxqe
— David Mack (@davidmackau) March 28, 2022
जाडा पिंकेटच्या टक्कल पडण्यावर भाष्य करताना ख्रिस रॉक म्हणाला की, टक्कल असल्यामुळेच या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ख्रिस रॉक विल स्मिथने मारल्यानंतर काहीवेळ स्तब्ध उभा राहिला. विल स्मिथने ख्रिसला सांगितलं की माझ्या बायकोचं नाव पुन्हा तुझ्या तोंडातून काढू नकोस. त्यामुळे या सगळ्यावर विचार केला असता त्याच्याकडून हा पुरस्कार परत घेतला जाऊ शकतो अशी चर्चा सध्या जोरदार पाहायला मिळत आहे.