मुंबई : अभिनेता, डान्सर आणि दिग्दर्शक अशा बहुविध भूमिका लिलया साकारणारा प्रभूदेवा समोर आला की, त्याचा हेवा वाटल्यावाचून राहत नाही. आपल्या तालावर भल्याभल्यांना नाचवणारा प्रभुदेवा आता पन्नाशीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. वय वाढत असतानाच त्याच्या लोकप्रियतेत मात्र तसुभरही कमतरता झाल्याचं दिसून आलेलं नाही.
दमदार डान्सर असण्यासोबतच प्रभुदेवा हा त्याच्या दिग्दर्शनासाठीही ओळखला गेला. अभिनेता सलमान खान याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागलेली असतानाच ‘वाँटेड’ साकारत प्रभुदेवानं त्यालाही मोठी मदत केली.
असं म्हटलं जातं की 16 वर्षांचं वैवाहिक नातं त्यानं अभिनेत्री नयनतारा हिच्यवरली प्रेमाखातर तोडलं होतं. त्यावेळी प्रभुदेवाला 3 मुलं होती. रामलतापासून दूर प्रभुदेवा नयनतारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.
रामलताला या नात्याची माहिती मिळताच तिनं न्यायालयात धाव घेतली. अखेर 2011 मध्ये प्रभूदेवा आणि नयनताराचा घटस्फोट झाला. पत्नी आयुष्यातून दूर गेली आणि तिथं प्रभुदेवाची अवस्था बिघडू लागली.
आर्थिक चणचण त्याच्या डोईजड होऊ लागली. घटस्फोटामुळं त्याला रामलताला 10 लाख रुपयांची संपत्ती द्यावी लागली होती. ज्यामुळं त्याच्यावर आर्थिक ओझं होतं. या तणावामुळं त्याची परिस्थिती पाहून अनेकांनाच धक्का बसला होता.
असं म्हणतात की, नयनतारानं प्रभूदेवाशी लग्न करण्यासाठी म्हणून ख्रिस्त धर्म त्यागून हिंदू धर्म स्वीकारला होता. पण, हे नातंच फार काळ टिकू शकलं नाही. पुढे नयनतारानं प्रभुदेवापासून दुरावा पत्करला. पण ती आजपर्यंत अविवाहितच राहिली.... पुढे या प्रेमकहाणीचं कोणतंही पान उलटलं गेलं नाही.