मुंबई : 'झी युवा' वाहिनीवरील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या 'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या सेटवर आता लगबग दिसू लागली आहे. मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे. कोरोनाच्या संकटाचा विचार करता, योग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. सेटवर नेमके वातावरण कसे आहे, आणि आपली लाडकी अभिनेत्री श्वेता शिंदे कशाप्रकारे काळजी घेत आहे, याविषयी तिच्याशी केलेली ही बातचीत;
मीरारोड, ही अत्यंत गजबजलेली जागा आहे. या 'रेड झोन'मध्ये चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मालिकेचे चित्रीकरण एका रिसॉर्टमध्ये सुरु आहे. मालिकेतील कलाकार व संपूर्ण टीम तिथेच राहते. कुणालाही बाहेरून आत येण्याची, अथवा बाहेर कुठेही जाण्याची परवानगी देण्यात येत नाही. जेवणाखाण्याच्या कारणाने सुद्धा कुणीही आवाराच्या बाहेर पडत नाही. संपूर्ण सेट, प्रत्येक कलाकारांची खोली या सगळ्याचं निर्जंतुकीकरण करण्यात येतं. मास्क, सॅनिटाजयझर्स, फेसशिल्ड या सगळ्याचा वापर करूनच चित्रीकरण केलं जातं. कलाकारांना सीनच्या दरम्यान या गोष्टी वापरणे अशक्य असते, त्यामुळे आम्ही कलाकार मंडळी अधिक खबरदारी घेत आहोत. एखाद्या सीनची तालीम करायची झाली, तरीही सामाजिक अंतर राखले जाते. आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, याचा विचार करून, सेटवरील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागत आहे.
दिग्दर्शक, मुख्य कलाकार या मंडळींनी पुढाकार घेऊन सेटवरील वातावरण सकारात्मक आणि उत्तम राहील याची काळजी घेणे आवश्यक असते. आमचा नेहमी हाच प्रयत्न असतो. आमच्यापैकी कुणालाही काहीही झालेले नाही आणि सगळेजण आपापली जबाबदारी ओळखून, उत्तमरीत्या काम करू याची जाणीव आमच्या वागण्याबोलण्यातून सर्वांना होईल याची संपूर्ण खबरदारी घेतली जाते. त्यामुळे सकारात्मक वातावरणात चित्रीकरण पार पडेल याची आम्ही काळजी घेत आहोत.
मी सातत्याने थर्मास सोबत ठेवते. गरम पाणी पीत राहणं, वेळोवेळी सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं, सुरु आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढेल यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मी करते आहे. चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार, नियमित व्यायाम या गोष्टी सुरु आहेत. आरोग्य उत्तम राहावं आणि कुठलाही आजार होऊ नये, यासाठी जी काही खबरदारी घेणं शक्य आहे, ती सर्व खबरदारी मी घेते आहे. सगळेच कलाकार योग्यप्रकारे, आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
माझा मेकअप मी स्वतःचा स्वतः करते आहे. माझी केशभूषा होण्याआधी त्यासाठी लागणार असलेली सर्व उपकरणं व्यवस्थित निर्जंतुक करण्यात येतात. मालिकेतील पोषाखासाठी वापरण्यात येणारे कपडे सुद्धा योग्यरीतीने निर्जंतुक करून मगच मी वापरते. या सर्व छोट्या गोष्टींची सवय नसल्यामुळे, सुरुवातीच्या काळात सगळंच थोडं कठीण वाटत आहे. मात्र यासगळ्याची सवय आम्ही हळूहळू करून घेत आहोत.
'झी युवा' वाहिनीवरील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या 'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या सेटवर आता लगबग दिसू लागली आहे. मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे. १३ जुलै पासून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कोरोनाच्या संकटाचा विचार करता, योग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरण केले जात आहे.
सेटवर नेमके वातावरण कसे आहे, आणि आपली लाडकी अभिनेत्री श्वेता शिंदे कशाप्रकारे काळजी घेत आहे, याविषयी बोलताना श्वेता म्हणाली, "मीरारोड, ही अत्यंत गजबजलेली जागा आहे. या 'रेड झोन'मध्ये चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मालिकेचे चित्रीकरण एका रिसॉर्टमध्ये सुरु आहे. मालिकेतील कलाकार व संपूर्ण टीम तिथेच राहते. कुणालाही बाहेरून आत येण्याची, अथवा बाहेर कुठेही जाण्याची परवानगी देण्यात येत नाही. आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, याचा विचार करून, सेटवरील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागत आहे.
मी सातत्याने थर्मास सोबत ठेवते. गरम पाणी पीत राहणं, वेळोवेळी सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं, सुरु आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढेल यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मी करते आहे. चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार, नियमित व्यायाम या गोष्टी सुरु आहेत. माझा मेकअप मी स्वतःचा स्वतः करते आहे. माझी केशभूषा होण्याआधी त्यासाठी लागणार असलेली सर्व उपकरणं व्यवस्थित निर्जंतुक करण्यात येतात. मालिकेतील पोषाखासाठी वापरण्यात येणारे कपडे सुद्धा योग्यरीतीने निर्जंतुक करून मगच मी वापरते. या सर्व छोट्या गोष्टींची सवय नसल्यामुळे, सुरुवातीच्या काळात सगळंच थोडं कठीण वाटत आहे. मात्र यासगळ्याची सवय आम्ही हळूहळू करून घेत आहोत."