Debina Bonnerjee on Her Daughter Early Schooling : आपल्या लहान मुलांना पालकांनी कधी शाळेत घालावं हा सर्वस्वी त्या पालकांचा निर्णय असतो. परंतु आपल्या एक वर्षांच्या मुलीला फार लवकरच शाळेत घातल्यानं हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री ट्रोल झाली होती. अभिनेत्री देबिना बॅनर्जीनं आपली मुलगी लियाना हिला लवकरच शाळेत टाकायला सुरूवात केली आहे. तिनं आपल्या लेकीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु त्यानंतर तिच्या या पोस्टवरून तिच्या चाहत्यांमध्ये मतंमतांतरं पाहायला मिळाली होती. तिला अनेकांनी असा प्रश्न विचारला होता की एवढ्या लहान वयात तिनं आपल्या लेकीला शाळेत का पाठवायला सुरूवात केली आहे? देबिना ही युट्यूबवर चांगलीच सक्रिय असते. ती आपले नानाविध व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या तिनं असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं आपल्या लेकीला लवकर शाळेत का घातलं यावर मतं मांडलं आहे.
सध्या मुलं ही लहान वयातच सोशल मीडिया स्क्रिनला फार लवकरच एडिक्ट होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना वेगळ्या कामात व्यस्त ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. पालकांसमोरील हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे अनेकदा पालक हे चिंतेतही असतात. यालाच धरून देबिनानं सोशल मीडियावरील व्हिडीओमधून भाष्य केले आहे. आपल्या लेकीला याच सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी देबिनानं हा निर्णय घेतला असल्याचे तिनं म्हटलं आहे. ती लियानाला 15 मिनिटांसाठी स्कूलमध्ये पाठवते आणि त्यातून तिला तिच्या मुलीला स्क्रिन एडिक्शनपासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळे ती तत्परेतेने याची काळजी घेताना दिसते आहे.
आपल्या व्हिलॉगमधून ती म्हणाली की, ती ज्या शाळेत जाते ती शाळा 15 मिनिटांची आहे. ही वेळ खरंतर तिच्या खेळाच्या वेळेपेक्षाही फार कमी आहे. मला माझ्या मुलांना व्यस्त ठेवायचे आहे. आधी लोकं हे एकत्र कुटुंबात राहायचे परंतु आता सर्वच जणं हे सिंगल फॅमिलीच्या हिशोबानं राहतात. तेव्हा अशावेळी आपल्या मुलांना स्क्रिनपासून लांब ठेवणे फार गरजेचे आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्रावर "राज" करावं' राज्याच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया चर्चेत
ती पुढे म्हणाली की तिची मुलगी लियाना ही कायमच टिव्ही पाहत राहायची. त्यामुळे तिनं लियानाला शाळेत पाठवायला सुरूवात केली आहे. ती म्हणते की, ''ही माझ्यावरील एक अतिरिक्त जबाबदारी आहे. सध्या पावसाळाही सुरू झाला आहे तेव्हा मला कल्पना नाही की आता मी तिला शाळेत सोडणं आणि नेणं कसं मॅनेज करणार आहे.'' असा खुलासा तिनं केला आहे.