Sridevi च्या Duplicate ला पाहून जान्हवी आणि खुशी बाचकतील

Sridevi यांची Duplicate पाहून तुम्हीही म्हणाल, 'सेम टू सेम...'  

Updated: May 18, 2022, 11:04 AM IST
Sridevi च्या Duplicate ला पाहून जान्हवी आणि खुशी बाचकतील title=

मुंबई : संपूर्ण जगात कोणत्या तरी कोपऱ्यात एक सारखे दिसणारे सात चेहरे असतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसारखे हुबेहूब दिसणारे चेहरे समोर आले. आता देखील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या सारख्या दिसणाऱ्या एका मुलीचे  व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. या मुलीला पाहिल्यानंतर फक्त श्रीदेवी यांच्या चाहत्यांचं नाही तर सर्वांना त्यांची आठवण येईल. हा तर चमत्कार....पाहून तुम्हीही म्हणाल अरेच्छा होय की...

श्रीदेवी यांच्या सारख्या दिसणाऱ्या मुलीचं नाव दिपाली चौधरी असं आहे. दिपाली एक प्रसिद्ध व्लॉगर आहे. व्हिडीओमध्ये ती बर्‍याच प्रमाणात श्रीदेवी यांच्यासारखी दिसते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दिपालीच्या व्हिडीओमध्ये दिपालीने श्रीदेवी यांच्या एका सिनेमातील एका दृश्याचा ड्रेस कॉपी केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

)

व्हिडीओमध्ये दिपाली, श्रीदेवी यांच्या सिनेमातील डायलॉग बोलताना दिसत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की दिपाली श्रीदेवी यांची परफेक्ट कॉपी आहे. तिच्या व्हिडीओवर अनेक युजर्स लाईक आणि कमेंट देखील करतात.