मुंबईः बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या स्टारडम आणि लक्झरी लाइफस्टाइलची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगते. खासकरुन अभिनेत्रींचे कपडे, त्यांच्या बॅग्स या विशेष चर्चिल्या जातात. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पर्सची.
दीपिकाने घेतलेली बॅग दिसायला अत्यंत साधी असली तरीदेखील त्याची किंमत ही साधीसुधी नसून चक्क लाखांच्या घरात आहे. दीपिका पदुकोण नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिनं गळ्यात एक छोटी पर्स घेतली आहे.
या छोट्या पर्सची किंमत वाचून तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या पर्सची किंमत 1 लाख 97 हजार इतकी आहे. तसंच दुसरी पर्सची जी तिनं कारमध्ये बसताना एका व्यक्तीच्या हातातून घेतली तिची किंमत आहे 2 लाख 70 हजार रुपये.
दीपिकाच्या लूकसोबतच तिच्या बॅगचीही नेहमीच चर्चा होते. दीपिकाने Louis Vuitton OnTheGo GM ही बॅग कॅरी केली होती. या ब्रँडच्या पर्स या लाखोंच्या घरात असतात. अनेक बड्या सेलिब्रिटी या ब्रँडच्या बॅग्स वापरतात.
दीपिका पदुकोण शेवटची 'गेहराईयाँ' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी काम केले होते. चित्रपटात दीपिका पदुकोणने सिद्धांत चतुर्वेदीसोबत जबरदस्त इंटिमेट सीन दिले होते. यापूर्वी दीपिका पदुकोणने '83' चित्रपटात काम केले होते ज्यामध्ये ती पती रणवीर सिंगसोबत दिसली होती.