संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांकडून श्रद्धांजली

या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते.

Updated: Dec 8, 2021, 09:53 PM IST
संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांकडून श्रद्धांजली title=

मुंबई : तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. 

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली. या अपघातात देशाचे पहिले chief of defence staff बिपीन रावत यांचं निधन झालं आहे. शिवाय या दुर्घटनेमध्ये 11 मृतदेह आतापर्यंत सापडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात बिपीन रावत यांच्यासह पत्नीचंही अपघाती निधन झालं आहे. 

 या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी असल्याचं बोललं जातय. जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त करून बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सलमान खानने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, "या दुःखद अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झालं ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर जवान गमावले. माझ्या संवेदना, माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.''

बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने देखील ट्वीट शेअर करत शोक व्यक्त केलंय. विवेकने ट्विटमध्ये लिहिलंय की, ''जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. सर, मातृभूमीच्या 4 दशकांच्या नि:स्वार्थ सेवेसाठी आम्ही तुम्हाला सलाम करतो. भारताच्या सर्वोत्कृष्ट सैनिकांपैकी एक सैनिक शहीद झाल्याबद्दल मी देशासोबत आहे. #RIP #Omshanti".

त्याचबरोबर दु:ख व्यक्त करत अभिनेत्री सोफी चौधरीने ट्विटरवर 'Deepest condolences' लिहिलं आहे.