Dharmaveer 2 : 'कोणताही धर्म किंवा समाज असो....' अंगावर शहारे आणणारा 'धर्मवीर 2' चा टीझर रिलीज

'धर्मवीर' च्या दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज झाल्याने मनोरंजन विश्वात सिनेमाची चर्चा होत आहे.

Updated: Jul 7, 2024, 02:44 PM IST
Dharmaveer 2 :  'कोणताही धर्म किंवा समाज असो....' अंगावर शहारे आणणारा 'धर्मवीर 2' चा टीझर रिलीज  title=

काही दिवसांपूर्वीच 'धर्मवीर' 2 सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सचिन पिळगावर , महेश कोठारे , निर्माते मंगेश देसाई आणि बॉबी देवल हे दिग्गज कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. अशातच आता दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज झाल्याने मनोरंजन विश्वात सिनेमाची चर्चा होत आहे.लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'धर्मवीर' सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. अ‍ॅक्शन आणि थ्रीलचा अनुभव देणाऱ्या  सिनेमाच्या पहिल्या भागाला  चांगला प्रतिसाद मिळाला होता.याच सगळयात महत्त्वाचं कारण म्हणजे आनंद दिघे यांच्या आयुष्यातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

टीझरध्ये दाखवण्यात आलं आहे की, आनंद दिघे यांना राखी पौर्णिमेला अनेक महिला राखी बांधायला येतात. त्यावेळी एक मुस्लीम महिला देखील दिघेंना राखी बांधायला येते.दिघे या महिलेला चेहरा दाखवायला सांगतात. त्यानंतर ही महिला तिचा बुरखा काढताच तिला मारहाण झाली असल्याचं स्पष्ट होतं. हे सगळं पाहून दिघेंच्या रागाचा पारा चढतो. आनंद दिघे महिलांचा खूप आदर करत होते. 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!' हा अंगावर शहारे आणणारा डायलॉग आणि टीझरमुळे आता प्रेक्षक वर्ग 9 ऑगस्टची वाट पाहत आहे. धर्मवीर सिनेमातील आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. सिनेमाचा दुसरा भाग मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.. पुन्हा एकदा दिघेंच्या हटके शैलीत प्रसाद ओक चाहत्यांच्या भेटीस येत आहे. 

 

धर्मवीरच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांच्या समाज कार्यावर प्रकाश टाकणारा प्रवीण तरडे, यानेच सिनेमाच्या  दुसऱ्या भागाचं लेखन आणि  दिग्दर्शन केले. झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स ने दुसऱ्या भागाची निर्मिती केली. सिनेमाचा पहिला भाग रिलीज झाला त्याचवेळी त्याचा दुसरा भाग येणार असल्याचं सांगीतलं होतं. पहिल्या भागात दिघेंच्या राडकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यात आला होता. आाता सिनेमाचा दुसरा भाग काय कोणतं वळण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.