Dharmendra on grandson's kissing scene: हल्ली बॉलिवूडमध्ये वेगळ्याच वादांना तोंड फूटत आहे. सध्या कलाकारांच्या किसिंग सीनवरून प्रेक्षकांमध्ये नाराजी निर्माण होत असून त्यावरून सोशल माीडियावर या कलाकारांना सपाटून ट्रोल केले जाते आहे. जूलै महिन्यात आलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रसिद्ध झाला. या चित्रपटावरूनही वाद सुरू झाले होते. एक म्हणजे कंगना राणावतनं करण जोहरचा चित्रपट म्हणून त्याच्यावर टीका केली होती हे सरळपणे दिसून आले होते. ती तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणाली होती की, 'आजच्या जगात 'ओपनहायमर'सारखे चित्रपट हे प्रेक्षकांना आवडू लागलेले असताना काय इथे परत परत त्याच घरगुती वादांवरील मेलोड्रॅमेटिक चित्रपट तयार होत आहेत.' दुसरा वाद, त्याला वाद नाही म्हणता येणार पण या चित्रपटात What Jhumka हे गाणं प्रचंड प्रसिद्ध झाले होते. त्यावर आशा भोसले यांनी नाराजीची प्रतिक्रिया दिली होती.
या चित्रपटातील सर्वाधिक चाललेला वाद होता तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या किसिंग सीनचा. त्यावरून त्या दोघांवरही टीका झाली आणि याचा खूप गदारोळ झाला. ज्यांनी चित्रपट पाहिला नव्हता तेही हा चित्रपट पाहायला गेले होते. आता कुठेतरी हा वाद प्रेक्षक हे विसरले आहेत परंतु धर्मेंद्र ते विसरलेले नाहीत असं दिसतंय तेही त्यांनी नुकतंच केलेल्या एका विधानावरून.
डीएनएच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांनी ज्येष्ठ गायक कुमार सानू यांनी आयोजित केलेल्या दुर्गा पूजेला उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना सोडलं नाही. एका पश्नावर त्यांनी असं उत्तर दिलं की नक्की धर्मेंद्र यांच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न कदाचित सर्वसमान्यांना पडल्यावाचून राहणार नाही.
हेही वाचा : VIDEO: ...अन् टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले चक्क धर्मवीर आनंद दिघे, पाहण्यासाठी जमली गर्दी
'दोनो' हा राजवीर देओलचा चित्रपट या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला आहे. यावेळी हा चित्रपट फारसा चांगला चालला नाही. राजवीर देओल हा सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू आहे. हा त्याचा डेब्यू चित्रपट होता. यात राजवीर देओलचेही अनेक किसिंग सीन्स होते. त्याला उद्देशून धर्मेंद्र यांनी आपल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील किसिंग सीनवर एक विधान केले आहे. ते म्हणाले की, ''चित्रपट हे प्रेक्षकांशी जोडण्याचे माध्यम आहे. माझ्या वाट्याला ज्या भुमिका येतात त्यांची निवड मी मनापासून करतो आणि तसे चित्रपट मी करतो. मला माहिती नाही की माझ्या नातवानं त्याच्या पहिल्याच चित्रपटात किती किसिंग सीन्स दिले परंतु माझ्या एका किसिंग सीनमुळे किती गदारोळ झाला. (मेरे एक किस का शोर हो गया)'' अशी प्रतिक्रिया धर्मेंद्र यांनी दिली व आपल्या आणि आपल्या नातव्याच्या त्या सीनशी आपली व त्याची तुलना केली.
हेही वाचा : '...देशमुखाचं शेंडेफळं' अमृतानं प्रसादसाठी घेतला उखाणा; केळवणाचे फोटो पाहिलेत का?
यावेळी त्यांच्या या थेट उत्तरानं सर्व प्रेक्षकांचे लक्ष वळवून घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच बॉलिवूडमधील फॉर्म्यूला चित्रपटांचा उत काही केल्या कमी झालेला नाही. किसिंग सीन्स दाखवणं हाही त्यातलाच एक प्रकार यात दूमत नाही. त्यातून अशा ज्येष्ठ आणि दिग्गज व्यक्तिमत्त्वांकडून, कलाकारांकडून पडद्यावर किसिंग सीन दाखवण्यात आल्यानं प्रेक्षकांच्याही नजरा वळल्या होत्या आणि सोशल मीडियाचे शस्त्र त्यांच्या हाती होते त्यामुळे वाद भोवऱ्यासारखा फिरत राहिला हेही तितकेच खरे.