दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून काढलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चा उडताच; कारण आलं समोर

Divya Khossla and Bhushan Kumar Divorce Rumors :  दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून पतीचं आडनाव काढल्यानंतर तिच्या आणि भूषण कुमारच्या घटस्टोच्या चर्चां सुरु झाल्या. त्यानंतर आता खरं कारण समोर आलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 22, 2024, 06:18 PM IST
दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून काढलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चा उडताच; कारण आलं समोर title=
(Photo Credit : Social Media)

Divya Khossla and Bhushan Kumar Divorce Rumors : बॉलिवूडमधील पावर कपल म्हणून भूषण कुमार आणि त्याची पत्नी दिव्या खोसला यांचा घटस्फोट झाल्याची अफवाह सुरु झाली होती. दिव्या खोसलानं नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पती म्हणजेच भूषण कुमारचं आडनाव काढूण टाकलं. इतकंच नाही तर तिनं भूषण कुमारच्या टी-सीरिज या कंपनीला अनफॉलो केलं होतं. असं म्हटलं जातं की त्या दोघांमध्ये वाद सुरु आहेत आणि त्याशिवाय ते दोघं घटस्फोट घेणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, सध्या जी माहिती समोर आली आहे त्यात असं म्हटलं आहे की त्यानं सांगितलं की दिव्यानं आडनाव काढून टाकण्याचं कारण काही दुसरंच आहे. 
 
भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सगळ्यांना आश्चर्यात पाडले आहे. 21 फेब्रुवारी रोजी दिव्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भूषण कुमारचं नाव काढून टाकलं आहे. त्याशिवाय तिनं टी-सीरीजला अनफॉलो देखील केलं. त्यांच्या लग्नाला जवळपास 19 वर्षे झाली आहेत आणि दिव्यानं केलेल्या या कृतीनं सगळ्यांना धक्का बसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोघांना एक मुलगा आहे आणि ते अनेकदा पब्लिक प्लेसेसमध्ये आणि प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये दिसतात. नुकत्याच एका कार्यक्रमात ते एकत्र दिसले होते. या गोष्टींमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. खरंतर या सगळ्या अफवांमध्ये एक गोष्ट आहे की दिव्या अजूनही भूषण कुमार यांच्या पर्सनल अकाऊंटला अजूनही फॉलो करते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, झूमच्या रिपोर्टनुसार, भूषण कुमारच्या टीमनं ते दोघं विभक्त झाले हे सत्य नसून फक्त अफवाह आहे असे सांगितले. T-Series च्या स्पोक्सपर्सननं या मुद्यावर स्पष्टीकरण दिलं आहे की दिव्यानं ज्योतिषीय कारणांमुळे असं केलं. त्यानं सांगितलं की हा तिचा पर्सनल डिसीजन आहे आणि लोकांनी त्याचा आदर करायला हवा. तर नावात एक्स्ट्रा 'S' लावण्याच्या मुद्यावर त्यांनी म्हटलं की ज्योतिषी कारणामुळे असं केलं आहे. 

हेही वाचा : भारती सिंगला हवा घालणारा 'तो' माधुरी दीक्षितचा मुलगा आहे हे कळताच तिला बसला धक्का; करण जोहरनं काय केलं माहितीये?

या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली की ते दोघं काही घटस्फोट घेत नाही आहेत. कोणी काहीही नसताना फक्त त्यांचं सोशल मीडिया पाहून ही अफवाह पसरवली आहे. दिव्या आणि भूषण यांची पहिली भेट ही ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ च्या सेटवर झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर 13 फेब्रुवारी 2005 मध्ये वैष्णो देवी मंदिराशी लग्न केलं. भूषण कुमार दिवंगत गायक गुलशन कुमार यांचा मुलगा आहे.