Rashmika Mandanna : दाक्षिणात्य रश्मिका मंदाना ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कन्नड अभिनय क्षेत्रात करिअर केल्यानंतर आता ती बॉलिवूडमध्ये देखील स्वत: चं स्थान निर्माण आहे. सध्या तिच्या आरोग्यावरून सोशल मीडियावर एक चर्चा सुरु झाली आहे. त्यात म्हटलं जातं आहे की रश्मिकाला त्वचे संबंधीत काही आजार आहे. खरंतर, मेकअप करताना वापरण्यात येणारे कॉस्मॅटिक्समध्ये अनेक केमिकल असतात त्यामुळे तिला ही समस्या झाल्याचे म्हटले जात आहे.
मेकअप केल्यानं त्वचा जळजळते, खाज येते आणि लाल होते. हे सतत होत असल्याचं पाहून रश्मिकानं डर्मेटोलॉजिस्तची भेट घेतली. तर तेव्हा तिला तिच्या या आजाराविषयी कळलं. शूटिंग दरम्यान, लाइट्समुळे येणाऱ्या उष्णतेमुळे मेकअप वितळतो. त्यात केमिकल असलेला कॉस्मॅटिक्सच्या वापरानं पिग्मेंटेशन वाढतं. त्यानंतर केस गळती आणि त्वचेची साल निघणं सुरु होतं. त्याला सोरायसिस म्हणतात. डॉक्टरांचं म्हणणं आहे की या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. दरम्यान, आता या सगळ्यावर रश्मिका किंवा तिच्या टीमनं प्रतिक्रिया दिलेली नाही.
खरंतर, रश्मिकाला नेमका काय झालंय हे माहित नसताना तिच्या विषयी अशी चर्चा होती की समांथासारखा गंभीर आजार तिला झाला आहे. समांथाला मायोसाइटिस असून तोच आजार हा रश्मिकाला झाला आहे. मात्र, तो आजार नसून सततच्या मेकअपमुळे तिला त्वचेच्या संबंधीत काही समस्या झाल्याचे म्हटले जाते. मात्र, या बातमीवर देखील रश्मिका किंवा तिच्या टीमकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा : 10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
दरम्यान, एकीकडे रश्मिका मंदाना ही तिच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यामुळे चर्चेत आहे. याशिवाय नुकतीच ती 'फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30' मध्ये दिसली होती. दुसरीकडे रश्मिका तिच्या आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. रश्मिका आणि विजय हे दोघे 'गीता गोविंदम' या चित्रपटावेळी जवळ आले. ते अनेकदा विमानतळावर दिसतात. पण त्यावेळी ते एकत्र नसल्याचे दाखवत वेगवेगळे येतात. पण त्या दोघांचे चाहते त्यांच्यातील काही ना काही साम्य शोधून काढतात. ते अनेकदा एकत्र ट्रिपवर जाताना दिसतात. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते.