सैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?

Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 24, 2025, 02:42 PM IST
सैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण? title=

Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी 2025 मध्यरात्री प्राणघात हल्ला झाला. मध्यरात्री 2 ते 2.30 दरम्यान सैफच्या राहता घरी एक अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घुसला होता. त्या अज्ञात व्यक्तीला पकडताना सैफ अली खान गंभीर जखमी झाला. सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद अटक केली आहे. मोहम्मद सैफच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याच्यावर चाकूने सहा वेळा हल्ला केला. अभिनेत्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यातून सैफ अली खान थोडक्यात बचावला आहे. सध्या अभिनेता चांगली असून अपघातानंतर अनेक सेलिब्रिटी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होतं. मात्र अभिनेत्याची पहिली पत्नी अमृता सिंग अद्याप त्याला भेटलेली नाही.

सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांच्याबद्दल अनेक चर्चा आहेत. एक काळ असा होता जेव्हा सैफ अली खान बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगच्या प्रेमात वेडा होता. त्याने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन आपल्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. या कठीण परिस्थितीत दोन्ही मुले वडिलांसोबत उभी आहेत तर अमृता मात्र सैफला भेटायला पोहोचली नाही. अभिनेत्री करीना कपूरमुळे अमृता सिंग सैफ अली खानपासून दूर राहते, अशी चर्चा रंगली आहे. 

सैफ अली खान आणि अमृता सिंगचे लग्न झाले पण त्यानंतरच त्यांच्यात वाद सुरू झाला. हळूहळू सैफ आणि अमृता यांच्यातील नाते तुटू लागले. अशा परिस्थितीत लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोघांनीही घटस्फोटाचे खरे कारण कधी सांगितलं नाही. सैफ अली खानने घटस्फोटानंतर अमृता सिंगला पोटगी म्हणून 5 कोटी रुपये दिले होते. मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत त्यांनी अमृताला दरमहा एक लाख रुपये दिले.

एका जुन्या मुलाखतीत सैफ अली खानने अमृता सिंगसोबतच्या नात्याबाबत अनेक गुपिते उघड केली होती. तो भावूक होत म्हणाला की त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर अमृता खूप चिडली होती आणि म्हणून तिला तिची दोन मुले सारा आणि इब्राहिमला भेटू दिले नाही. एका जुन्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये सैफ अली खान म्हणाला होता- माझ्या वॉलेटमध्ये माझा मुलगा इब्राहिमचा फोटो आहे. त्याची आठवण आल्यावर तो फोटो पाहून भावूक होतो. सैफ पुढे म्हणाला होता, अमृताला वाटते की माझ्या आयुष्यात एक नवीन महिला आली आहे आणि ती माझ्या मुलांना त्यांच्या आईविरुद्ध भडकवेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, अमृता सिंग ज्या महिलेबद्दल बोलत होती ती दुसरी कोणी नसून करीना कपूर होती. मात्र, नंतर सर्व काही ठीक झाले. आता सारा आणि इब्राहिम त्यांचे वडील सैफ अली खान आणि दुसरी आई करीना कपूर यांना भेटतात आणि कौटुंबिक कार्यक्रमांना देखील हजेरी लावतात. जरी करीना कपूर आणि अमृता सिंग एकमेकांशी बोलत नाहीत. पण सारा आणि इब्राहिम यांचे करीना आणि त्यांच्या दोन्ही मुलांशी जिव्हाळ्याच नात आहे.