'तू पैशांची चिंता करु नको, फक्त...'; 'Roadies 20'च्या स्पर्धकाला प्रिंस नरूला, एल्विश यादव असं का म्हणाले?

Elvish Yadav - Prince Narula :  एल्विश यादव आणि प्रिंस नरूलानं स्पर्धकासाठी का केला मदतीचा हात पुढे... नक्की काय झालं...

दिक्षा पाटील | Updated: Jan 13, 2025, 01:55 PM IST
'तू पैशांची चिंता करु नको, फक्त...'; 'Roadies 20'च्या स्पर्धकाला प्रिंस नरूला, एल्विश यादव असं का म्हणाले? title=
(Photo Credit : Social Media)

Elvish Yadav - Prince Narula : 'रोडीज सीजन 20' च्या प्रीमियर एपिसोडची सगळीकडे चर्चा सुरु आहे. रोडीजच्या या 20 व्या सीझनचं नाव 'रोडीज डबल क्रॉस' आहे. यावेळी त्यांनी अनेक जुन्या लोकांना पुन्हा शोमध्ये आणलं आहे तर काही नवीन लोकांना लाइनअप करण्यात आलं आहे. या शोमध्ये स्पर्धक योगेश आणि आकाश आले हते. दोघंही डान्सर आणि त्यांनी ऑडिशन दरम्यान परिक्षकांची मने जिंकली. ते दोघं या शोमध्ये सिलेक्ट झालेत. तर आकाश हा प्रिन्स नरुलाच्या टीममध्ये गेला तर योगेश हा रिया चक्रवर्तीच्या टीममध्ये गेला. या दरम्यान, त्याच्या दृठ संकल्प आणि परिस्थितीला पाहत त्याच्या ग्रुपचा लीडर प्रिन्स नरुला आणि एल्विश यादवनं त्यांच्या वडिलांच्या  उपचारासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं.  

यावेळी प्रिन्स आणि एल्विश हे दोघे योगेशला म्हणाले की पैशांची चिंता करु नको कारण ते दोघं मिळून त्याला जी मदत लागेल ती करतील. प्रिन्सनं सांगितलं की खेळाविषयी चिंता कर, पैशांविषयी नाही. असं म्हणत त्या दोघांनी योगेशसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. 

दरम्यान, रणविज सिंग हा शोचा होस्ट म्हणून आला आहे. नेहा धूपियानं देखील यावेळी एक गॅंग लीडर म्हणून कमबॅक केलं आहे आणि तिचे अनुभव हे त्या सगळ्या स्पर्धकांसोबत शेअर करताना दिसते. तिच्यासोबत युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता एल्विश यादव देखील आहे. त्यान एक गॅंग लीडर म्हणून त्याची सुरुवात केली आहे. या सीझनमध्ये प्रिन्स नरुला आणि रिया चक्रवर्ती देखील गॅंग लीडर म्हणून सहभागी झाले आहेत. 

हेही वाचा : 'जलसा' च्या बाहेर बिग बींनी घेतली चाहत्यांची भेट, चर्चा मात्र बाल्कनित असलेल्या अभिषेकची

या शोमध्ये स्पर्धक आणि गॅंग लीडर हे मस्ती करत सगळे टास्क पूर्ण करताना दिसतात. या शोची जेव्हा पासून घोषणा करण्यात आली आहे तेव्हापासून सगळे हा शो पाहण्यासाठी आतुर आणि उत्साही आहेत. त्याशिवाय या आठवड्यापासून हा शो सुरु झाला असल्यानं पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.