Pathaan Break 10 Records: किंग खान इज बॅक... तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुख खानने (Shah Rukh Khan) हे वाक्य अगदी योग्य ठरवलंय. बॉलीवूड (Bollywood) संपत चाललंय बोलणाऱ्या ट्रोलर्सना (Trollers) शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चोख उत्तर दिलं आहे. पहिल्याच दिवशी पठाणने भारतात जवळपास 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात क्वचितच एखाद्या चित्रपटाने इतकी धमाकेदार ओपनिंग केली असावी. इतकंच नाही तर पठाणने पहिल्याच दिवशी अनेक रेकॉर्ड ब्रेक (Record Break Collection) केले आहेत.
प्रदर्शनापूर्वी या चित्रपटावरुन बराच वाद रंगला (Pathaan Controversy) होता. चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. पण याचा फारसा परिणाम चित्रपटावर झाला नाही. उलट चित्रपट थिएटरला येण्यापूर्वीच अॅडव्हानस बुकिंग हाऊस फूल (House Full Advance Booking) झालं. इतकंच नाही तर चित्रपटाच्या टीझरला (Teaser) करोडो व्ह्यूज मिळाले. आता बॉलिवूडचा किंग खान प्रदीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसतोय म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता दिसतेय. चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली आहे, अजून बरेच रेकॉर्ड मोडायचे बाकी आहेत. भारतात पहिल्या दिवशी या चित्रपटाने 54 कोटींची कमाई केली तर जगभरात तब्बल 100 कोटींच्या घरात या चित्रपटाने कमाई केली.
जगभरातील कमाईचा आकडा
U.A.E + G.C.C: $1.60 Million
North America: $1.50 Million
U.K. & Europe: $650k
ROW: $750k
Total: $4.50 Million
याबरोबरच चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 रेकॉर्ड मोडले आहेत
1. भारतात आतापर्यंत सर्वाधिक स्क्रिनवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट
2. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट
3. सुट्टीचा दिवस नसतानाही पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड कमाई
4. यशराज बॅनरचा तिसरा चित्रपट ज्याने पहिल्याच दिवशी 50 हून अधिक कोटीचा बिझनेक केला. याआधी वॉर (53.35 करोड), ठग्स ऑफ हिंदुस्तान (52.25 करोड) आात आता पठाण (54.00) कोटी
5. तिसरा यशराज स्पाय युनिव्हर्स चित्रपट, ज्याने एक था टायगर आणि वॉरनंतर रेकॉर्ड रचला
6. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा शाहरुख खानच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट
7. अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या कारकिर्दीतलाही पहिला चित्रपट, ज्याने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली
8. पहिल्याच दिवशी दमदार कमाई करणारा अभिनेता जॉन अब्राहनच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट
9. यश राज फिल्म्सचाही पहिल्या दिवसी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
10. डायरेक्टर सिद्धार्थ आनंदच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
भारतीय चित्रपटांसाठी ऐतिहासिक दिवस
पठाणच्या भव्य यशानंतर चित्रपटाचे सीईओ अक्षय वधानी (Akshay Wadhani) यांनी भारतीय हिंदी चित्रपटांसाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचं म्हटलं आहे. जगभरात पठाणला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचं प्रेम लाभलं आहे. सुट्टीचा दिवस नसतानाही पठाणने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यामुळे थिएटरचा कारभार यापुढेही सुरु राहणार असल्याचे ह संकेत असल्याचं अक्षय वधानी यांनी म्हटलंय. यापुढेही असे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न असेल जे प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणतील, असंही वधानी यांनी सांगितलं.
दुसऱ्या दिवशीही रेकॉर्ड कायम
पठाणने पहिल्या दिवशी 54 कोटींचा आकडा पार केला. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला सुट्टीचा दिवस असल्याने चित्रपट 60 कोटींचा आकडा गाठेल असा दावा चित्रपट समीक्षकांनी केला आहे. म्हणजेच दोन दिवसातच भारतात हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये पोहोचेल असा अंदाजही वर्तवला जातोय. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला नवी उर्जा मिळाली आहे. 2022 मध्ये हिंदी चित्रपटांना जे ग्रहण लागलं होतं, ते वर्षाच्या सुरुवातीलाच सुटलं आहे. याच आनंदात झुमे खान परिवारकडून पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीची होस्ट गौरी खान होती, विशेष म्हणजे या पार्टीत भाईजान अर्थात सलमान खानही सामील झाला होता.
पाकिस्तानातही पठाणचं कौतुक
पठाण हा चित्रपट पाकिस्तानाच प्रदर्शित करण्यात आलेला नाही. पण तिथल्या चित्रपटसृष्टीने शाहरुख खानचं कौतुक केलं आहे. पाक अभिनेत्री माहिरा खानने आपल्या इन्स्टाग्रमा अकाऊंटवर शाहरुख खानबरोबरचा चित्रपट रईसचा फोटो शेअर केला आहे.
---