मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतून अनेक धक्कादायक बातम्या येत आहेत. काही दिवासांपुर्वी कलादिग्दर्शक नितीन देसाईयांच्या निधनाने सिनेसृष्टी ते सामान्यापर्यंत अनेकांना धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा अशीच एक दुख:द बातमी मनोरंजन क्षेत्रातून येत आहे. ही बातमी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून समोर आली आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेता आणि डान्स कर्नाटक डान्सचा परिक्षक विजय राघवेंद्रच्या पत्नीचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या पत्नीचे नाव स्पंदना असून सोमवारी बँकॉकमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाल आहे. तिच्या पश्चात पती विजय राघवेंद्र आणि मुलगा शौर्य असा परिवार आहे.
स्पंदनाला छातीत दुखत असल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि तिचं उपचारादरम्यानच निधन झालं. स्पंदनाचे पार्थिव ८ ऑगस्ट रोजी बंगळुरू याठिकाणी आणण्यात येईल. आणि ईथे तिच्यावर अंत्यसंस्कार होतील. स्पंदनाच्या निधनानंतर कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सँडलवुड सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांसह सँडलवुडमधील अनेक सेलिब्रिटींनी स्पंदनाच्या अशा अचानक जाण्याने शोक व्यक्त केला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पंदनाच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार स्पंदना तिच्या कुटुंबासह सुट्टीसाठी बँकॉकमध्ये गेली होती, स्पंदना आणि विजय यांच्या लग्नाचा सोळावा वाढदिवस याच महिन्यात साजरा केला जाणार होता. २००७ साली स्पंदना आणि विजय यांचे लग्न झाले होते, त्यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले.
त्यांना शौर्य नावाचा मुलगाही आहे. तुलू कुटुंबातील असणारी स्पंदना ही माजी पोलीस अधिकारी शिवराम यांची मुलगी आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या रविचंद्रन यांच्या 'अपूर्व' सिनेमात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. हा तिचा कन्नड सिनेविश्वातील पहिलाच सिनेमा होता. मनोरंज विश्वातून तिच्या अचानक जाण्यामुळे शोक व्यक्त करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.