Heeramandi : 14 वर्षानंतर कमबॅक करणारा फरदीन खान ट्रेलर लॉन्चवेळी झाला भावूक म्हणाला, 'माझ्यासाठी हा...'

Heeramandi Trailer Fardeen Khan : हीरामंडीच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता फरदीन खान भावूक... 14 वर्षानंतर कमबॅक करण्यावर म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: Apr 10, 2024, 10:51 AM IST
Heeramandi : 14 वर्षानंतर कमबॅक करणारा फरदीन खान ट्रेलर लॉन्चवेळी झाला भावूक म्हणाला, 'माझ्यासाठी हा...' title=
(Photo Credit : Social Media)

Heeramandi Trailer Fardeen Khan : 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रेम अगन' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेला अभिनेता फरदीन खान हा 14 वर्षांनंतर पदार्पण करणार आहे. हे पदार्पण फरदीन 'हीरामंडी' या शोमधून करणार आहे. त्याची पहिली क्षलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल गुढी पाडव्याच्या निमित्तानं या शोचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या लॉन्चिंग दरम्यान, फरदीन भावूक झाल्या आहेत.

हीरामंडीच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात फरदीन खाननं त्याच्या स्क्रीनपासून लांब असलेल्या इतक्या गॅपविषयी सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की "सगळ्यात आधी माझ्यासाठी हा खूप मोठा गॅप ठरला. कमीत कमी हे सांगण्यासाठी जवळपास 14 वर्ष झाली आहे. मी या जबरदस्त अशा स्टारकास्टसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. नेटफ्लिक्ससारखा प्लॅटफॉर्म आणि स्वत: संजय लीला भन्साळी, एक कलाकार म्हणून स्क्रिनवर परतण्यासाठी या पेक्षा चांगली संधी असण्याची आशा मी कधीच केली नव्हती."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फरदीन पुढे त्याच्या भूमिकेविषयी म्हणाला की" 'हीरामंडी' मध्ये मला योग्य भूमिका मिळाली. माझ्यासाठी हे काही असं होतं ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता आणि ही माझ्यासाठी एकदम योग्य भूमिका होती. स्क्रीनवर परत येण्यासाठी मी ज्या वयात आहे त्यात तुम्हाला आयुष्यात आलेला अनुभव आणि ज्ञानासोबत येतात आणि तुम्हाला माहित आहे की संजय जे काही लिहितात त्यात तुम्ही योगदान करु शकतात." 

पुढे फरदीन संजय लीला भन्साळी यांची स्तुती करत म्हणाला, "त्यांच्या भूमिका या गुंतागुंतीच्या असतात आणि खूप कॉम्प्लेक्स देखील असतात. त्यांच्यासारखी भूमिका लिहिणारा कोणी नाही. ते भावनांसोबत भूमिका लिहितात आणि त्याविषयी त्यांना चांगलीच समज आहे. त्यासोबत काम करणं म्हणजे आव्हानात्मक असतं, पण त्याच्यासोबत तुम्ही हे सगळं पण पाहता तर तुम्हाला ते कळतं. आता मी भावूक होतोय... या संधीसाठी मी खूप आभारी आहे आणि इथे येऊन मला खूप आनंद झाला."

या सीरिजविषयी बोलायचे झाले तर मनीषा कोयराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेगल सारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. त्याशिवाय फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन आणि ताहा शाह सारखे कलाकार देखील पाहायला मिळणार आहे. ही सीरिज 1 मे रोजी तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.