Gadar 2 Director Slam's Producers : बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटानं भारतात बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तर आता हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार करणार आहे. तर 'गदर 2' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अनेक प्रेक्षक आजही हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. तर टोटल वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 600 कोटींचा आकडा पार करणार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांवर निशाना साधला आहे. बॉक्स ऑफिसचे खोटे आकडे सांगत चित्रपटाला हिट असल्याचे सांगत आहेत.
पूजा तलवार यांना दिलेल्या मुलाखतीत अनिन शर्मा यांनी निर्मात्यांवर निशाना साधला आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की 'काही बॉलिवूड चित्रपट हे प्रेक्षकांना थिएटरमध्ये घेऊन येण्यात अपयशी ठरले.' यावर उत्तर देत अनिल म्हणाले 'बॉलिवूड चित्रपट नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांना त्यांच्याकडे खेचत असल्याचे पाहायला मिळते. पण ही खूप वाईट गोष्ट आहे की हिट हा टॅग मिळवण्यासाठी काही निर्माते असं काही करतात जे त्यांनी करायला नको.'
अनिल पुढे म्हणाले, 'आजकाल जे होतंय ते खूपचं वाईट आहे. अनेकदा चित्रपच हिट होत नाही तर निर्माते खोटे आकडे सांगतात. स्वत: तिकिटांची खरेदी करतात आणि आणखी अनेक गोष्टी करतात ज्यानं ब्रॅंड होऊ शकेल. पण प्रेक्षकांना फसवणूक होत असल्याचे जाणवते. यानं खूप नुकसान होऊ शकतं. कारण जेव्हा दुसरा चित्रपट येतो तेव्हा प्रेक्षक परत येत नाहीत. त्यांना वाटतं की सगळेच खोटं बोलणारे आहेत, सगळे फेक आहेत.'
हेही वाचा : काय... प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? VIRAL व्हिडीओमागचं सत्य समोर येताच खळबळ
'गदर 2' विषयी विचारायचे झाले तर 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर' या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमीषा पटेल आणि अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि मनीष वाधवा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 'गदर 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर 18 दिवसात चित्रपटानं 538.20 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं 593.20 कोटींचा आकडा पार केला आहे.