Play Store वरील App मुळं जॅकलिनही फसली; तुम्हा ते वापरत नाही ना?

अनेक धक्कादायक स्कॅम करण्याचं सत्र सध्या सुरु आहे.     

Updated: Dec 17, 2021, 06:03 PM IST
Play Store वरील App मुळं जॅकलिनही फसली; तुम्हा ते वापरत नाही ना?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  नुकताच ईडीकडून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला होता. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला फसवण्यासाठी आरोपी सुकेश चंद्रशेखर यानं गृह मंत्रालयातून फोन केला होता, हाच तो खुलासा. 

जॅकलिनला हा कॉल स्पूफ करुन करण्यात आला होता. यामध्ये स्कॅम करणाऱ्या व्यक्ती दुसऱ्या नंबरवरून फोन करतात. 

कॉल स्पूफिंगच्याच मदतीने सुकेश चंद्रशेखरनं अमित शाह यांच्या कार्यालयातून कॉल केला होता. ज्यामुळं हा गृह मंत्रालयातील कॉल असल्याचं तिला वाटलं होतं. 

Call Spoof ही काही नवी बाब नाही. याच्या वापरानं अनेक धक्कादायक स्कॅम करण्याचं सत्र सध्या सुरु आहे.   

गुगल प्ले स्टोअरवर असे अॅप उपलब्ध आहेत. ज्यामधून कोणत्याही क्रमांकावरून अमुक एका व्यक्तीला तुम्ही कॉल लावू शकता. 

अशी काही संकेतस्थळंही आहेत ज्यांच्या मदतीशिवाय तुम्ही कोणालाही कोणत्याही नंबरने कॉल करु शकता. प्लेस्टोअरवर असे अॅप असणं हीच बाब मुळात धक्कादाय़क आहे. 

तिहार जेलमध्ये 'या 'महाठगाला भेटायला यायच्या 10 प्रसिद्ध अभिनेत्री? सत्य अखेर समोर

 

कारण, कोणीही हे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वारस करु शकतं. कॉल करण्यासाठी या अॅपकडून काही पैसे आकारले जातात. त्यामुळं आता या अॅपवर बंदी केव्हा घातली जाणार हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 

कॉल स्पूफमुळे अनेक मोठे गुन्हे घडले आहेत. याच पद्धतीचा वापर करत अपहरणकर्ते बक्कळ पैशांची मागणीही करतात. काही संस्था गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी असे अॅप वापरतात हा या साऱ्यामध्ये अपवादाचा मुद्दा. 

अपवादाची एक गोष्ट वगळली, तर सातत्यानं चुकीच्या पद्धतींनी अशा अॅपचा वापर केला जाणं हे दिवसागणिक अधिकच घातल होत चालल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

अभिनेत्री जॅकलिन हिचीही फसवणूक अशाच पद्धतीनं झाल्याची बाब सध्या हादरा देत आहे.