Hema Malini and Raj Kapoor: हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सर्वोत्तम चित्रपट (Movie) केले आणि खूप नाव कमावले. पण कोणीतरी असा होता जो लोकप्रियतेच्या शिखरावर होता आणि त्याचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत (Hindi cinema) वेगवेगळ्या ठिकाणी घेतले गेले. तो बॉलिवूडचा (Bollywood) शो मॅन (Show Man) राज कपूर होता. ज्यांच्या सुपरहिट चित्रपटांनी त्यांना सुपरस्टारही (Superstar) बनवले. (Hema Malini ran away from the films nz)
प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असायचे त्यांच्या चित्रपटांचा एक भाग बनण्याचे आणि जर एखाद्या अभिनेत्रीला मुख्य भूमिका मिळाली तर ती तिचे आयुष्य खूलून निघायचे. पण हेमा मालिनी त्यांच्यात खूप वेगळी होती, जेव्हा तिने राज कपूरच्या (Raj kapoor) हिट चित्रपटाची नायिका होण्यास नकार दिला आणि सेटवरून पळ काढला.
जेव्हा राज कपूर सत्यम शिवम सुंदरम (Satyam Shivam Sundaram) सारख्या चित्रपटावर काम करत होते. त्यावेळी राज कपूर यांना हेमा मालिनी यांना लीड रोलमध्ये (Lead Role) घ्यायचे होते, म्हणून त्यांनी हेमा मालिनी यांना रोल आणि स्क्रीन टेस्टवर (Screen Test) चर्चा करण्यासाठी बोलावले. येथे पोहोचल्यानंतर चित्रपटाविषयी चर्चा झाली आणि हेमा मालिनी यांना त्यांच्या पात्राची म्हणजेच लूकची (Look) माहिती मिळाली. त्या चित्रपटातील पात्राच्या लूकविषयी ऐकून त्यांना आवडले नाही. पण तरी त्या काहीच बोलल्या नाहीत. अखेरीस राज कपूरने तिला चित्रपटातील पात्राच्या म्हणजेच रूपाच्या गेटअपमध्ये येण्यास सांगितले आणि ड्रेस तिच्या हातात दिला. हे बघून हेमा मालिनी या गोंधळल्या.
हिंमत एकवटून हेमा मालिनी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्या पण एवढी धाडसी भूमिका करताना त्यांना जरा संकोच वाटत होता. काय करावे ते समजत नव्हते. तिथे राज कपूर त्यांच्या लुक टेस्टची (Look Test) वाट पाहत होते. बराच वेळ तयार होऊनही जेव्हा अभिनेत्री परतली नाही, तेव्हा राज कपूर यांना कळले की हेमा मालिनी ड्रेसिंग रूममध्येही (Dressing room) नाही, त्या तिथून निघून गेल्या होत्या.
मग राज कपूरला प्रकरण काय आहे ते समजले आणि हेमाला चित्रपटात काम करायचे नव्हते. त्याचवेळी, वर्षांनंतर एका मुलाखतीत (Interview) हेमा मालिनी यांनी तेथून शांतपणे जाण्याचे कारणही सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या राज कपूर यांना नाही म्हणू शकल्या नाहीत कारण त्यांनी ही भूमिका त्यांना आशेने ऑफर केली होती. अशा स्थितीत ते न कळवता तेथून निघून जाणे हे मला योग्य वाटले.