मुंबई : अनुराग कश्यप या दिग्दर्शकाची विशिष्ट शैली आहे. त्यांच्या शैलीवरून त्यांचे सिनेमे पटकन ओळखता येतात. पण हा सिनेमा त्यांच्या शैलीपेक्षा खूप वेगळा. कसा ते पहा...
१. अनुराग कश्यप यांच्या पूर्वीच्या सिनेमांपेक्षा या सिनेमाचा विषय अगदी वेगळा आहे. वेगळ्या धाटणीचा हा कश्यप यांचा पहिला सिनेमा आहे.
२. जानेवारीत अनुराग कश्यप यांचा ‘मुक्काबाज़’हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी सेक्रेड गेम्स आणि मनमर्जियां वर काम सुरु केले. फेब्रुवारीत मनमर्जियांचे शूटिंग सुरू झाले. पंजाब, दिल्ली आणि काश्मीर या ठिकाणी सिनेमाचे शूटिंग होणार आहे.
३. अमिताभ बच्चन त्यांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच शीख व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. १ मार्चला ट्वीट करुन नवीन कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती अमिताभजींनी दिली होती.
४. मसान, रमन राघव २.० यांसारख्या सिनेमात दिसलेले विकी कौशल आणि पिंक मधील तापसी तन्नू यांची जोडी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
तापसी एका पंजाबी मुलीची व्यक्तिरेखा साकारत असून ती अमृतसर येथे राहते. ती एका स्पोर्ट्स शॉपची मालकीन आहे. आपल्या पालकांकडून तिने हॉकीचे प्रशिक्षण घेतले आहे.
५. ही एक लव्ह स्टोरी आहे. या रोमांटिक ड्रामाची टॅगलाईन आहे- Everything is fair when love is war!
६. इरोस फिल्म्स, आनंद एल राय आणि फॅटम फिल्म्स यांनी एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.
७. २०१५ मध्ये हा सिनेमा करण्याच्या तयारीत असताना काही कारणास्तव तो रोखण्यात आला. म्हणजे मध्ये मध्ये काही ना काही अडथळे येत राहीले. त्यानंतर आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या कामाला गती आली आहे.
८. या सिनेमाच्या कास्टमध्येही बदल करण्यात आले आहेत. अंतिम क्षणी अभिषेक बच्चनचे कास्टिंग झाले आहे. अनुराग कश्यप यांच्या हाती देखील हा प्रोजेस्ट खूप वेळाने आला.