मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार ऋतिक रोशनने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्याने भितीशी लढण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ऋतिकने स्वत: या ओळी लिहून आपल्या खास शैलीत म्हटल आहे. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याने हा खास व्हिडिओ समर्पित केलायं. मुलगा रेहान रोशनसाठी ऋतिकने हा व्हिडिओ ट्विट केलाय. मी काहीतरी शेअर करतोय, जे मी लिहिलय...हे सर्व मुलं आणि मुलींसाठी आहे आणि स्वत:च्या मुलांसाठी प्रेरणा आहे.' असे यावर त्याने लिहिले आहे. काल म्हणजे २८ मार्चला संध्याकाळी ७.३० ला हा व्हिडिओ त्याने ट्विट केला. त्यानंतर काहीवेळातच हा व्हिडिओ रिट्विट करण्यात आला.
To all our sons and daughters and to the child within us all. Sharing something I wrote . ( headphones please) pic.twitter.com/e6eROF770t
— Hrithik Roshan (@iHrithik) March 28, 2018
लोकांनी म्हटलं होत ६ बोटांचा कधी स्टार होऊ शकणार नाही. भिती तुला सतावेल. पण तू हा आत्मविश्वास दाखवशील की भितीच्या नजरेला नजर देशील. अशा अनेक गोष्टी ऋतिकने या व्हिडिओतून सांगितल्या आहेत. ऋतिकला आपल्या मुलासोबत वेळ घालविणे खूप आवडते.