मुंबई : हृतिक रोशन आणि कंगना रनौत पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. ऑफस्क्रीन सुरू असलेली दोघांची भांडण लवकरच ऑनस्क्रीनदेखील दिसणार आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल दोघांची येत्या २५ जानेवारीला जोरदार धडक होणार आहे.
Mark the date: #Manikarnika -The Queen Of Jhansi to release on 25 Jan 2019 [Republic Day]... Stars Kangna Ranaut... Directed by Krish... Produced by Zee Studios and Kamal Jain.
— taran adarsh (@taran_adarsh) 21 July 2018
हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांची भांडण आता ऑनस्क्रीनदेखील पोहोचली आहेत. याआधी आपण दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहिले होते. काही महिन्यांपूर्वीच ते दोघेही आपल्या भांडणामुळे माध्यमांमध्ये चर्चेत आले होते. पण आता लवकरच ते वेगळ्या रुपात धडकताना दिसतील. कंगना रनौत सध्या हैदराबादमध्ये 'मणिकर्णिका' सिनेमाच्या शूटींगसाठी व्यस्त आहे. तर हृतिक रोशलदेखील 'सुपर ३०' च्या शूटसाठी बिझी आहे. 'मणिकर्णिका' आणि 'सुपर ३०' २५ जानेवारी २०१९ ला बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी धडकणार आहेत. त्यामुळे हृतिक आणि कंगनाच्या चाहत्यांना पुन्हा एक टशन पाहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी कंगना आणि हृतिक यांच्यातील रिलेशनशीपच्या बातम्या समोर आल्या होत्या. हृतिक रोशनने सुजैनशी काडीमोड घेतल्यानंतर कंगनाकडे त्याची ओढ वाढल्याच्या चर्चा होत्या. पण कंगनाने नॅशनल टीव्हीवर हे सारे वृत्त खोटे असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता २५ जानेवारीला यांच्यातील धडक पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.