मुंबई : बॉलिवूडमधली दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा नवा सिनेमा लैला मजनू येऊ घातला आहे. १० वर्षांपासून इम्तियाज अली या सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. त्यानंतर हा सिनेमा रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला. इम्तियाज यांच्या या कथेत प्रेमात पागल झालेल्या प्रेमीची कहाणी आहे.
यावेळेस इम्तियाज यांनी सांगितले की, या गोष्टीचा विचार खूप आधीपासून मनात होता. पण या सिनेमाचे दिग्दर्शक मला करायचे नव्हते. गोष्ट माझी आणि कोणत्यातरी नव्या दिग्दर्शकाने ती पडद्यावर साकारावी, असे मला वाटत होते. या सिनेमाबद्दल इम्तियाज अली म्हणाले की, एका लव्ह स्टोरीत ज्या गोष्टी असायला हव्यात त्या सर्व या सिनेमात आहेत. इतर लव्ह स्टोरीजपेक्षा वेगळा आणि खूप मनापासून बनवलेला हा सिनेमा आहे.
#ImtiazAli and @ektaravikapoor at the trailer launch of #SajidAli #LailaMajnu #LailaMajnuTrailer pic.twitter.com/GpNPAuSlkw
— Bhawna Munjal (@bhawnamunjal) August 7, 2018
या सिनेमातून डेब्यू करत असलेली तृप्ती डिमरीने सांगितले की, लैलाचे पात्र हटके आहे. २०१८ ची लैला खूप मोठी फर्ल्ट आहे. मुलं तिच्यामागे लागलेली तिला आवडतात. ती आपल्याच जगात जगत आहे. तिच्या मेंदूत एक वेगळा सिनेमा सुरु आहे. ज्याची ती हिरोईन आहे. तिला फक्त आयुष्याची मज्जा घ्यायची आहे. ती कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाही. अगदी प्रेमही. तिला प्रेमाचा अर्थ देखील माहित नाही. ती खऱ्या लैलापेक्षा खूप हटके आहे.
या सिनेमाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या सिनेमातून दिग्दर्शक साजिद अलीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.