मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हा 'जग्गू दादा' म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. सामान्य माणसालाही आपलासा वाटणारा जग्गू दादा खूप भावूक असल्याचं अनेकदा अनुभवलं आहे. जॅकी श्रॉफ हा आपल्या आईच्या अतिशय जवळ होता. पण आईच्या निधनानंतर त्याला एका गोष्टीचा खूप पश्चाताप होत आहे.
जॅकी श्रॉफ यांचे वडिल काकाभाई श्रॉफ हे ज्योतिषी होते. तर आई रिता श्रॉफ याचं खरं नाव हुरून्निसा श्रॉफ या गृहिणी होत्या. जग्गू दादा आपल्या आईच्या अगदी जवळ होते. जग्गू यांच्या भावाचे वयाच्या 17 व्या वर्षी निधन झाले.
अभिनेता जॅकी श्रॉफ हे जवळपास 33 वर्षे मुंबईतील चाळीत राहिले. मात्र प्रसिद्ध आणि यश मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांनी मोठ्या घरात राहण्याचा आग्रह केला. यानंतर जॅकी यांनी चाळीतलं घर सोडून मोठ्या घरात राहण्याचा आग्रह धरला.
यानंतर जॅकी श्रॉफ मोठ्या घरात शिफ्ट झाले. जॅकी यांच्या मोठ्या घरात प्रत्येकाला वेगवेगळ्या खोल्या होत्या. मुलांची वेगळी खोली, आईची वेगळी खोली. घरं मोठं होतं पण माणसं एकमेकांपासून लांब आहेत, ही बाब अनेकदा जॅकी श्रॉफ यांच्या मनात यायची. (जॅकी श्रॉफची आई गेली, तरीही तिच्या मायेची ऊब तो नेहमी सोबत ठेवतोय...)
जॅकी श्रॉफ यांच्या खोलीच्या अगदी बाजूची खोली त्यांच्या आईची होती. एक दिवस रात्री जॅकी श्रॉफ यांच्या आईचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. जॅकी श्रॉफ यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. रात्री आईने आपल्याला त्रास होत असेल तर आवाज दिला असणार. पण या वेगळ्या खोल्या असल्यामुळे आपल्याला तिचा आवाज आला नसेल.
त्यामुळे घरं मोठं झालं, वेगळ्या खोल्या झाल्या मात्र आई माझ्यापासून दुरावली ही गोष्ट आजही जॅकी श्रॉफ यांना सतावत आहे. जॅकी श्रॉफ यांनी ही खंत एका मुलाखतीत बोलून दाखवली आहे.