मुंबई : अभिनेत्री कल्कि केक्ला गेल्या १० वर्षांपासून या इंडस्ट्रीचा भाग आहे. २००९ मध्ये 'देव डी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी कल्कि यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सामिल आहे. कल्किने नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सीरीज 'सेक्रेड गेम्स २'च्या ऑडिशनबाबतचा किस्सा सांगतिला आहे.
कल्किने, ती सेक्रेड गेम्सची चाहती असल्याचं सांगतिलं होतं, आणि एक दिवस तिला सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनसाठी ऑडिशन देण्यासाठी फोन आला. आपल्याला आवडत असलेल्या सीरीजमध्ये काम करण्याची संधी मिळत असल्याने तिला आनंद आणि याबाबत धक्काचं बसला असल्याचं ती म्हणाली.
पण 'सेक्रेड गेम्स २'साठी ऑडिशन दिल्यानंतर पुढील तीन आठवडे तिला कोणताचं फोन आला नाही. 'फोन न आल्यामुळे ही संधी माझ्या हातून गेल्याचंच मला वाटलं. त्यानंतर मला एक फोन आला आणि आणखी एक ऑडिशन देण्याबाबत सांगण्यात आलं.'
'पण अशाप्रकारे पुन्हा ऑडिशन देण्यासाठी फोन आल्याने माझ्या निवडीबाबत मला कोणताच अंदाज येत नव्हता. माझी निवड झाली की नाही? याबाबत काहीच स्पष्ट होत नव्हतं. त्यानंतर मी पुन्हा एकदा वेगळी साडी नेसून दुसरं ऑडिशन दिलं असल्याचं' कल्किने सांगितलं.
'सेक्रेड गेम्स २'मध्ये कल्कि, बात्या अबेलमनची भूमिका साकारणार आहे. ती पंकज त्रिपाठी साकारत असलेल्या गुरुजी या व्यक्तिरेखेची भक्त दाखवण्यात आली आहे.
'सेक्रेड गेम्स २'मध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुरवीन चावला, जतिन सरना, ल्यूक केन्नीसह इतर अनेक कलाकार भूमिका साकारणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी सीरीज प्रदर्शित होणार आहे.